खडक पोलीस ठाणे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अग्नीशस्त्रासह जेरबंद

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

पुणे : online news आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने खडक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण यांनी दिल्या असता दिनांक १३/११/२०२४ रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम_यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे साहील खान रा.एकबोटे कॉलनी लोहीयानगर पुणे याचेकडे पिस्टल असुन तो भावसार मंगल कार्यालय जवळ लोहीयानगर पुणे याठिकाणी उभा आहे, अशी बातमी मिळाली.

सदरची बातमी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना कळविले असता त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहूल गौड यांना कळविले असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पो.उप-निरी. प्रल्हाद डोंगळे व स्टाफ असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणाचे जवळपास आडबाजुस वाहन पार्क करुन सर्व स्टाफ बातमीचे ठिकाणी जावून, बातमीप्रमाणे इसम नामे साहिल खान रा. एकबोटे कॉलनी, लोहियानगर याठिकाणी उभे असलेले दिसले त्यास स्टाफचे मदतीने पाठलाग पकडून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साहील मजिद खान, वय २७ वर्षे, रा. २८८ घोरपडे पेठ भावसार मंगल कार्यालयाजवळ एकबोटे कॉलनी लोहीयानगर पुणे असे सांगितले.

त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता साहिल मजिद खान याचे पँन्टमध्ये कंबरेस उजव्या बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे नेसते पँटचे डाव्या खिशात ०१ जिवंत राऊंड मिळुन आले. त्याचेकडील एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह त्याची प्रत्येकी किंमत ५०,०००/- रूपये व ०१ जिवंत राऊंड त्याची किंमत रुपये १,०००/- किंमतीचा असा एकूण ५१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्यास दिनांक १३/११/२०२४ रोजी अटक करण्यात आली. नमूद अटक आरोपी यांचेविरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत. १) खडक पोलीस ठाणे गु.र.नं. १९७/२०२४ भा.द.वि. कलम ३२६,५०४,५०६

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे श्री. संदिपसिंह गिल, व मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे श्रीमती नूतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राहूल गौड सहा. पो.निरी. अनिल सुरवसे, पो.उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, शेखर खराडे, लखन ढावरे, सद्दाम तांबोळी, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश मठपती, विश्वजीत गोरे, शोएब शेख, इरफान नदाफ यांचे पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment