त्यांना साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं! शरद पवारांनी सांगितला १९८०मधला खास किस्सा

Sharad Pawar: आपल्याला जे जे सोडून गेलेत, त्यांचं आता काय करायचं, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांनी टेंभुर्णीतील सभेत केला. त्यावर उपस्थितांनी पाडायचं असं उत्तर दिलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूर: आपल्याला जे जे सोडून गेलेत, त्यांचं आता काय करायचं, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांनी टेंभुर्णीतील सभेत केला. त्यावर उपस्थितांनी पाडायचं असं उत्तर दिलं. ते उत्तर ऐकताच शरद पवारांनी असं तसं पाडायचं नाय, जोरात पाडायचं, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. अभिजीत पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. पाटील यांना शरद पवारांनी माढ्यातून उमेदवारी दिली आहे. माढ्याचे आमदार बबन शिंदे सलग सहावेळा निवडून आले असून पक्षफुटीनंतर ते अजित पवारांसोबत गेले.

सोडून गेलेल्यांना असं तसं पाडायचं नाही, जोरात पाहायचं. संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. कोणाचाही नाद करा, पण, असं शरद पवारांनी म्हणताच सभेत जमलेल्या सगळ्यांनी एकसुरात शरद पवारांचा नाद करायचा नाय, असं जोरात म्हटलं. शरद पवारांनी घेतलेली आक्रमक भूमिका साथ सोडून गेलेल्या सगळ्यांसाठीच सूचक इशारा मानला जात आहे. शरद पवारांच्या सभेला शेकडोंची गर्दी होती. पवारांच्या भाषणाला उपस्थितांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे सभा अतिशय जिवंत झाली.
Eknath Shinde: मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण..; दादा, भाऊंनंतर भाईंचं विधान; पुढचा मुख्यमंत्री सांगितला
शरद पवारांनी सभेत १९८० च्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. ‘१९८० मध्ये माझे ५८ आमदार निवडून आले होते. मी परदेशात गेलो. परत आल्यावर पाहतो तर ५८ पैकी ५२ आमदार मला सोडून गेले होते. मग तीन वर्षे महाराष्ट्र पुन्हा पिंजून काढला आणि सर्व नव्या दमाचे उमेदवार उभे केले. मला सोडून गेलेल्या ५२ पैकी एकही आमदार परत निवडून आला नाही,’ असंही शरद पवार म्हणाले.
Amit Shah: प्रचाराचा सुपर संडे अन् शहांच्या सभा अचानक रद्द; नागपूरहून तातडीनं दिल्लीला परतले; कारण काय?
१९८० मधील किस्सा सांगत आता जे सोडून गेले, त्यांचं काय करायचं, असा प्रश्न पवारांनी विचारला. ‘आम्हाला ४० वर्षे साथ दिली म्हणता. पण आता सोडून गेले आहेत. त्यांचं काय करायचं,’ असा सवाल पवारांनी केला. त्यावर त्यांना पाडायचं, असं उत्तर सभेतील गर्दीनं दिलं. ‘त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. जागा दाखवायची असेल तर साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं,’ असं आवाहन पवारांनी केलं.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionMaharashtra Political NewsMaharashtra politicsncpअजित पवारबबन शिंदेमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहेश शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Comments (0)
Add Comment