Ajit Pawar in Pune Nhavare : अजित पवार न्हावरा इथे महायुतीच्या उमेदवारासाठी सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जागे राहा, रात्र वैऱ्याची आहे… असा सल्ला दिला आहे.
न्हावरा येथे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ अजितदादा पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी अजित पवार यांनी विरोधी उमेदवार अशोक पवार यांना टोला लगावाला की, ‘अशोक बेटा, माझी का बदनामी करतोस?’ भावकी उण्याची वाटेकरी असते. माझी का बदनामी करतो, मी काय त्याचं घोडं मारलं.. बांध रेटला… मी म्हणेल ते खरं… अनेक कंगोरे आहेत तो कारखाना बंद पडला… मला कारखाना बंद पडायचा असता, तर व्यंकटेश बंद पडला असता, मी मदत करणारा कार्यकर्ता आहे असा उल्लेख केला.
अजित पवारांनी स्थानिक रोजगार, लाडकी बहिण योजना, कालव्याचे पाणी, चासकमानचे काम आणि शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा यांसारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
या सभेत अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत, माऊली कटके यांच्या विजयासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. माऊली कटके यांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजयी तुम्ही करणार असून २३ तारखेला विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
बाबांनो रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा…! भर सभेत अजितदादा कार्यकर्त्यांना असे का म्हणाले?
तसेच “घोडगंगा साखर कारखाना बंद पडला तो आर्थिक गैरव्यवस्थेमुळे. मी मदत करणारा कार्यकर्ता आहे, बदनामी करणारा नाही.” कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी एससीडीसी कर्जाचे काम मार्गी लावण्याची जबाबदारी स्वीकारली असून लवकरच घोडगंगा कारखाना सुरू करणार असून यावर्षी कोणाचेही उसाचे कांडे शिल्लक राहणार नाही, शेजारील सर्व कारखान्यांना ऊस नेण्याची विनंती, प्रसंगी त्यात राज्य शासनाची मदत करण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले.