Praniti Shinde On Muslim Candidate In Solapur : खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या मतदारांनी मुस्लिम उमेदवाराला का उमेदवारी दिली नाही असा जाब विचारला. यावर प्रणिती शिंदेंनी मतदारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
काँग्रेसच्या अकरा मुस्लिम नेत्यांनी आमदारकीची उमेदवारी मागितली
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदें यांना सोलापूर शहरात मुस्लिम समाजातील मतदारांनी रविवारी दुपारी जाब विचारला. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. सोलापुरातील मुस्लिम जनतेने लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंना भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून काँग्रेसमधील आणि महाविकास आघाडीतील अकरा मुस्लिम नेत्यांनी एकत्रित येत, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती.
…त्या मुस्लिम नेत्याने काँग्रेसची उमेदवारी नाकारुन प्रहार पक्षाकडून अर्ज भरला
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसकडून चेतन नरोटे यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी एकत्रित येत मागणी केल्यानंतर, काँग्रेसचे मुस्लिम समाजाचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांना सोलापूर शहर मध्य विधानसभेची उमेदवारी देण्याचे ठरले होते. बाबा मिस्त्री दक्षिण सोलापूरची उमेदवारी मागितली होती, मात्र मध्य विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देताना त्यांनी नाकारले होते. काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी बच्चू कडू यांच्या पक्षाकडून दक्षिण सोलापूर मतदार संघात उमेदवारी अर्ज भरला आहे.
Praniti Shinde : मुस्लिम उमेदवारीवरुन मतदारांनी प्रणिती शिंदेंना भररस्त्यात घेरले, सडेतोड उत्तर; म्हणाल्या, उमेदवारी दिली असती तर…
त्यांनी दोन टक्के देखील मतदान घेतलं नसतं; प्रणिती शिंदेंचं सडेतोड उत्तर
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी रविवारी दुपारी प्रणिती शिंदेंचे वाहन अडवले. तुम्ही मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली नाही? असा जाब त्यांना विचारला होता. त्यावर प्रणिती शिंदेंनी सडेतोड उत्तर देत, मुस्लिम समाजातील बाबा मिस्त्री यांना काँग्रेसची उमेदवारी दिली जात होती, मात्र त्यांनी नाकारली. काँग्रेसमधील अकरा नेत्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यावर उत्तर देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या ते लोक दोन टक्के देखील मतदान घेऊ शकले नसते. प्रणिती शिंदें आणि मतदारांमध्ये झालेली शाब्दिक चकमक सोशल मीडियावर चर्चेत आहे.