‘मला आमदार केले तर आपल्याला राज्याच्या मंत्रिमंडळात…’ भरसभेत ठाकरेंच्या शिलेदाराने निकालाआधीच दंड थोपटले

Vaibhav Naik Statement on Maharashtra Minister Post: कोणीही किती काहीही सांगितले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. मला आमदार केले तर मला राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा काम करण्याची संधी मिळेल, असा शब्दांत आमदार वैभव नाईक यांनी मतदारांना साद घातली.

Lipi

सिंधुदुर्ग : कोणीही किती काहीही सांगितले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता येथे काम करतो तेव्हा लोकांची सुद्धा माझ्याकडून अपेक्षा असते. असे सांगत मला दोन वेळा येथून आमदार केलेत आता पुन्हा मला आमदार केले तर मला राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा काम करण्याची संधी मिळेल, असा शब्दांत आमदार वैभव नाईक यांनी मतदारांना साद घातली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण मतदारसंघात माणगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत वैभव नाईक बोलत होते.

आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले की, आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे याच बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. या अश्रूंच्या बदला आपण सगळ्यांनी दहा वर्षांपूर्वी घेतला आणि मला सगळ्यांनी आमदार केले. आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे, याच बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना मुंबईत घर दिली नगरसेवक महापौर विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री अशी सगळी पद दिली. पण याच बाळासाहेबांना आता जे जे उमेदवार आहेत ते कशा स्वरूपात बोलले होते, बाळासाहेबांबद्दल कशी अवेहलना केली होती, असे सांगत त्यांनी महायुतीमधील शिवसेनेवेचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर वैभव नाईकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.
Uddhav Thackeray: तू राज्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढलीस! ठाकरेंकडून भरसभेत पंकजा मुंडेंचे आभार, कारण काय?
वैभव नाईक पुढे म्हणाले, आज त्याच बाळासाहेबांचा फोटो घेऊन त्यांचे चिन्ह घेऊन तुम्हाला निवडणूक लढवावी लागते राणेंची निती आहे. आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्ताने सगळ्यांनी शपथ घेतली आहे. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, त्यांना सगळ्यांना लोकशाहीच्या मार्गाने त्यांना सगळ्यांना घरात बसवण्याचे काम आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये कराये आहे. शिवसेनेशी ज्यांनी ज्यांनी आजवर गद्दारी केली, त्यांची काय अवस्था झाली हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे आणि तीच अवस्था याठिकाणी होणार आहे, असाही टोलाही नाईकांनी लगावला. तर राज्यात आता सत्ता परिवर्तन होणार आहे, महाविकास आघाडी आपलं सरकार सत्तेवर येणार आहे, असाही विश्वास देखीव त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांचा समाचार घेत त्यांनी आपलं चिन्ह चोरल आमचा पक्ष चोरला पण सगळे त्याच ताकदीने पुन्हा येथे कामाला लागले आहेत. सर्व शिवसैनिक काम करत आहेत असं सांगत माझी निशाणी काय आहे मशाल किती नंबरला आहे दोन नंबरला आणि हेच आपण सगळ्यांना वीस तारखेला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा आपल्याला ऋण व्यक्त करत कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडून दया अस आवाहन त्यांनी यावेळी केलं.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

kudal vidhan sabhamaharashtra CM postMaharashtra vidhan sabha nivadnukNilesh RaneVaibhav Naikनिलेश राणेंवर टीकामहाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरामहाविकास आघाडीचे सरकारविधानसभा निवडणुकीच्या घडामोडीवैभव नाईकांचे विधान
Comments (0)
Add Comment