प्रियंका गांधींच्या रॅलीदरम्यान मोठा राडा, काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले, नागपुरातील वातावरण तापले

Dispute Between Congress and BJP karyakarta Priyanka Gandhi rally: नागपूर मधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर : नागपूर मधून मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा झाला आहे. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये झेंडे मिरवले आहेत. काँग्रेसचा प्रचार हिंदूविरोधी आहे असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. यामुळे भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. परिणामी रोड शो दरम्यान कार्यकर्ते भिडल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते.

नागपूर पश्चिमचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी यांचा रोड शो आयोजित कऱण्यात आला होता. रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक देखील सहभागी झाले होते. ही रॅली नागपूरच्या बडकर चौकात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी्ही आक्रमक होत भाजपच्या कार्यकर्त्यांना जाऊन भिडले. यामुळे नागपूरातील वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
Pratibha Pawar: शरद पवारांच्या पत्नीला बारामती टेक्सस्टाईल पार्क बाहेर रोखलं; मिसेस पवारांचा सॉल्लिड सवाल
प्रियांका गांधी यांचा रोड शो संघाच्या मुख्यालयाजवळ येणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली होती. यासाठी भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून तेथे जमले होते. काँग्रेस कार्यकर्ते देखील तयारीत होते. रोड शो संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील बडकत चौकात आले आणि दोन्ही बाजू्च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केल्याची माहिती आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

candidate vikas Thakre rallycongress and bjp disputeMaharashtra vidhan sabha nivadnukPriyanka Gandhi nagpur road showकाँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडलेप्रियंका गांधी रोड शोविकास ठाकरेंच्या प्रचाराला गालबोटविधानसभा निवडणुकीच्या घडामोडी
Comments (0)
Add Comment