नाशिकमध्ये मनसेला दुसरा धक्का, निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या शिलेदाराने राजकीय ट्रॅक बदलला

Nashik West Vidhan Sabha MNS: नाशिक मध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते असलेले मनसेचे शिलेदार दिलीप दातीर यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा उद्या थंडावणार आहे. त्याआधी मात्र राजकीय वातावरण मात्र तापलेले दिसत आहे. यातच नाशिक मध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते असलेले मनसेचे शिलेदार दिलीप दातीर यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मतदान प्रक्रियेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले दिलीप दातीर यांना मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराज असलेल्या दिलीप दातीर यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सीमा हिरे यांना दिलीप दातार यांनी पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. दिलीप दातार यांची नाराजी बळावल्याने त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीत मनसेला याचा फटका बसणार असल्याची चिन्ह आहेत. तर या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढणार आहे.
Pratibha Pawar: शरद पवारांच्या पत्नीला बारामती टेक्सस्टाईल पार्क बाहेर रोखलं; मिसेस पवारांचा सॉल्लिड सवाल
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नाशिकचे माजी महापौर आणि मनसे नेते अशोक मुर्तडक यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने मविआचंही पारडं जड झालं आहे. नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता असताना अशोक मुर्तडक हे महापौर होते. असा मोठा नेता ठाकरे गटात जाण्याचा धक्का कायम असताना दिलीप दातार यांनीही मोठा निर्णय घेतल्याने मनसेला दुसरा धक्का बसणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Maharashtra vidhan sabha nivadnukmns dilip datarnashik west bjp candidatenashik west vidhan sabha politicsraj thackerayनाशिक पश्चिम भाजप उमेदवारनाशिक पश्चिम विधानसभेतील राजकारणमनसेचे दिलीप दातारराज ठाकरेंची भूमिकाविधानसभा निवडणुकीच्या घडामोडी
Comments (0)
Add Comment