Numerology Prediction, 18 November 2024 : 18 नोव्हेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही दिवसभर व्यस्त असणार आहात. मूलांक 2 च्या जातकांचा जास्त खर्च होणार आहे. मूलांक 4 असणाऱ्यांनी आळस टाळा, कामाला लागा हे लक्षात ठेवा. मूलांक 5 असणाऱ्यांनी काम करताना सतर्क राहा. मूलांक 7 च्या लोकांना शाब्दिक फटकारे मिळतील पण त्यामुळे तुमचे टेन्शन वाढेल. मूलांक 9 असणाऱ्यांची खूप चिडचिड होणार असून रागावर नियंत्रण ठेवावे. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – कामाचा वाढता ताण, चिडचिड फार
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही दिवसभर व्यस्त असणार आहात. तुमच्यावर कामाचा प्रचंड भार आहे त्यामुळे तुमचा ताणतणाव वाढू शकतो. तुमची खूप चिडचिड होणार आहे आणि तुम्ही इतरांवर राग काढाल. आज स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न ठेवा, लवकरच हा ताणतणावाचा काळ निघून जाईल. सगळी परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल.
मूलांक 2 – खर्च जास्त होणार, व्यवहारात लाभ
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही मुलांच्या बाबतीत तुम्ही व्यस्त असणार आहात. काही कारणामुळे पैसे जास्त खर्च होणार आहेत. पेहराव किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस चांगला आहे. मालमत्ता किंवा जमीनीचा व्यवहार तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
मूलांक 3 – काही कारणांमुळे मन अस्थिर
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही सगळ्यांसोबत चांगले वागू शकत नाही याची खंत मनात ठेवू नका. संध्याकाळपर्यंत परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. विरोधकांसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत दिवस ठिक आहे.
मूलांक 4 – आळस टाळा, कामाला लागा
मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही अभ्यास करायचा कंटाळा कराल. जेव्हा पुस्तक हातात घ्याल तुम्हाला झोप येईल पण असे करू नका. तुम्ही आता अभ्यास केला नाही तर त्याचा ताण तुमच्यावर येईल. ऑफिसच्या कामातही फोकस महत्त्वाचा आहे. लांबच्या प्रवासाचा योग असून तुम्हाला त्यात फायदा आहे.
मूलांक 5 – काम करताना सतर्क राहा
मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही मनमौजी होवून आपल्याच धुंदीत असे काही काम कराल ज्यामुळे तुम्हालाच भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा आज तुमच्या मूडवर विशे लक्ष ठेवा. कोणतेही काम करताना सावध राहा. लवलाइफच्या बाबतीत मित्रांची मदत घ्याल.
मूलांक 6 – तुमची करण्याची इच्छा पूर्ण होणार नाही
मूलांक 6 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही कोणालातरी मदत करण्याचा प्रयत्न कराल पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. त्याबद्दल स्वतःला दोषी मानू नका. घरात वातावरण ठिक असेल तसेच घरातील कामांनादेखील वेळ द्या. कार्यक्षेत्रात कामे वाढत आहेत तुम्ही नीट लक्ष देवून काम करा.
मूलांक 7 – शाब्दिक फटकारे टेन्शन वाढविणार
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक नाही. तुमच्यावर आज शाब्दिक मारा होवू शकतो. शाब्दिक फटकाऱ्यांमुळे तुम्हाला खूप वाईट वाटेल. काम नीट झाले नाही यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असाल. फार ताणतणाव करू नका. सगळं काही ठिक होईल आणि परिस्थिती तुमच्या बाजूने असेल फक्त संयम ठेवा.
मूलांक 8 – वादविवाद टाळा, सकारात्मक विचार करा
मूलांक 8 साठी आजचा दिवस ठिक आहे पण कामाच्या बाबतीत लोकांसोबत वादविवाद टाळणे खूप गरजेचे आहे. वादविवादामुळे तुम्ही दुखावले जावू शकता. सकारात्मक विचार करा त्याचा खूप फायदा होईल.
मूलांक 9 – खूप चिडचिड होणार, रागावर नियंत्रण ठेवा
मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आज एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होवू शकतो, त्यामुळे तुम्ही खूप चिडणार आहात. रागावर कंट्रोल ठेवा अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. कामांचे नियोजन नीट करा आणि कामात फोकस ठेवा.