Beed Crime: ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार, दोन जखमी, नेमकं काय घडलं?

Beed Firing: संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हायलाइट्स:

  • ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये मध्यरात्री गोळीबार
  • बीडमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
  • धक्कादायक घटनेत दोन युवक जखमी
Lipi
बीड मध्यरात्री गोळीबार

दिपक जाधव, बीड : बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमध्ये झालेल्या या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस सध्या अधिक तपास करतायत. बीड लातूर रोडवरील सेलू आंबा टोल नाक्यावर ही घटना घडली. या घटनेमध्ये दोन युवक जखमी झालेत. संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने पोलीसही सतर्क झाले आहेत. सध्य पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जातोय.
Ajit Pawar : ‘जोर का झटका धीरे से लगा’! ‘तो राग माझ्यावर काढू नका’; अजित पवारांची बारामतीकरांना कळकळीची विनंती

दरम्यान, दुसरीकडे बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा येथे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना या सभेला येता आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मोबाईलहून उपस्थितांना वर्चुअल मार्गदर्शन केले. पंकजा मुंडे शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान नाशिक मधील सभा आटोपून त्यांना धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी शिरसाळा येथे पोहोचायचे होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना पोहोचता आलं नाही.

लोकसभा निवडणुकीत बहिणीच्या विजयासाठी धनंजय मुंडे यांनी जिल्हा पिंजून काढला होता. आता संपूर्ण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा पंकजा मुंडे सांभाळत आहेत. दरम्यान सध्या पंकजा मुंडेंचा या वर्चुअर मार्गदर्शनाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सभेसाठी जमलेल्यांना फोनवरुन मार्गदर्शन केलं.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

beed crime newsbeed firing two injuredbeed midnight firingcrime newsक्राइम बातम्याबीड क्राइम बातम्याबीड गोळीबार दोन जण जखमीबीड मध्यरात्री गोळीबार
Comments (0)
Add Comment