Amravati Accident: घरी परतताना काळाची झडप, भरधाव ट्रकची कारला धडक, तिघांचा करुण अंत

Amravati Accident: अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग व बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी सुनील यांना त्यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

हायलाइट्स:

  • अज्ञात वाहनाची जोरदार धडक
  • भीषण अपघातात तीन ठार, एक जखमी
  • अमरावती जिल्ह्यातील घटना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अमरावती अपघात

अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास वडुरा गावाजवळ ही घटना घडली. अजय यादव, ऋषिकेश कराळे व रजत मेश्राम, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये सुनील गोंदूरवार हा युवक जखमी झाला आहे. हे चौघेही एक वाजताच्या सुमारास कारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जात असताना त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग व बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी सुनील यांना त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी; चांदवडमधील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही तरुण वाहन क्रमांक २७ बीएल ६६९९ हे शनिवारी रात्री बडनेरा सुपर हायवेवरुन घरी परत येत होते. त्यावेळी त्यांच्या कारला अज्ञात ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने मृत आणि जखमींना तात्काळ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अजय यादव. ऋषीकेश कराळे, रजत मेश्राम यांना तपासून मृत घोषित केले, तर जखमी सुनील गोंदूरवार याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अपघाताला कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास बडनेरा पोलिस तपास करत आहेत.

अमरावतीचे राजकारण तापले

दरम्यान, अमरावती जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगले तापले आहे. काल दर्यापूर मतदारसंघातील खल्लार येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची प्रचार सभा सुरू असताना त्यांच्यावर अश्लील हातवारे करण्यात आले. त्यामुळे उपस्थित विशिष्ट समुदायातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. यामुळे खल्लार येथे काही काळ तणावाची परिस्थिती होती.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

accident newsAmravati accident newsamravati badnera highway car accidentcar and truck accidentअपघात बातम्याअमरावती अपघात बातम्याअमरावती बडनेरा हायवे कार अपघातकार आणि ट्रक अपघात
Comments (0)
Add Comment