ओमराजेंकडे काम नेलं की फोनमध्ये तोंड खुपसतात, बड्या नेत्याने शिवबंधन सोडलं, ‘कमळ’ हाती

Shiv Sena UBT leader joins BJP : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत प्रतीक रोचकरी आणि बप्पा​राज मित्र मंडळाच्या सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Lipi

रहीम शेख, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची राळ उठली असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेचे राज्य विस्तारक प्रतीक रोचकरी यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला. रोचकरींनी शिवबंधन सोडत हाती ‘कमळ’ घेतले आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीची उमेदवार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत प्रतीक रोचकरी आणि बप्पाराज मित्र मंडळाच्या सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

प्रतीक रोचकरी काय म्हणाले?

गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी शिवसेनेचे काम करत असून एक रुपयाची अपेक्षा सुद्धा केली नाही. तसेच मी पक्ष वाढीसाठी माझ्यावर अनेक केसेस घेतल्या, तसेच अनेक आंदोलने सुद्धा केली. मला स्थानिक जिल्ह्यातले पद द्यायला पाहिजे होते, परंतु तसे न होता मला इतर जिल्ह्यातले पद दिले, असे रोचकरी म्हणाले.
Uddhav Thackeray : भाजपमधील मायलेकाची जोडगोळी ठाकरे गटात, एक लाख मतं घेणारा वंचित नेताही शिवबंधनात

ओमराजेंवर घणाघाती आरोप

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे मी कुठले काम घेऊन गेलो, तर ते फोनमध्ये तोंड घालून बसत असत किंवा पुतळ्यासारखे बसत, माझ्याकडे पाहत नसत, त्यांचा स्वभाव आता बदललेला आहे, आता ते खासदार झाल्यामुळे त्यांना माझी आवश्यकता नाही असं मला वाटतंय, असंही रोचकरी म्हणाले.

Pratik Rochkari : काम नेलं की फोनमध्ये तोंड खुपसतात, ओमराजेंनी पक्षांतर केलं तर… बड्या नेत्याने शिवबंधन सोडलं, ‘कमळ’ हाती

त्यांना मास लीडर नको आहे, त्यांच्याबरोबर कोणी मास लीडर नाही, ते काय करतात त्यांचा आणि जनतेचा डायरेक्ट संपर्क राहावा असं त्यांना वाटतं. त्यांना अध्ये-मध्ये कोणी नेता नको आहे, उद्याच्याला जर मी स्ट्रॉंग झालो तर मला फोन येतील म्हणजे शंभर फोन आले तर मला 50 फोन येतील, उद्या ओमराजे निंबाळकर यांनी जर पक्षांतर केलं तर हे लोक त्यांच्याबरोबर जातील याचे षडयंत्र सुरू आहे, असेही रोचकरी म्हणाले.
Eknath Shinde : कुठल्याही पदाची लालसा नव्हती, ठाकरे मात्र मुख्यमंत्रिपदासाठी गल्ली ते दिल्ली फिरले, एकनाथ शिंदेंचा प्रहार

भावनिक भाषणं आणि रिल्स

खासदार होण्यापूर्वी जरांगे पाटील यांना किती वेळेस भेटले ते पहा आणि खासदार झाल्यानंतर जरांगे पाटील यांना एकदाही भेटले नाहीत, ते पण पहा. ही त्यांची भूमिका बदललेली आहे. खासदाराचे काम हे फक्त फोनवरती आणि रिल्सवरती आहे. वाढदिवसाला शुभेच्छा देणे, रिल्स करणे आणि भावनिक भाषण करणे, भावनिक भाषण करून लोकांची दिशाभूल करायची. यामुळे मी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे, असे प्रतीक रोचकरी यांनी म्हटले आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Omprakash RajenimbalkarPratik RochkariRanajagjitSinhUddhav ThackerayVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे शिवसेना राजीनामाठाकरे गट नेता भाजप प्रवेशधाराशिव बातम्याप्रतीक रोचकरी भाजप प्रवेशराजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment