डॉली चायवाला हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. डॉली चायवालाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नेहमीच सोशल मीडियावर डॉली चायवालाचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. खास शैलीमध्ये तो चहा बनवतो.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे बघायला मिळतंय. प्रचार शिगेला पोहोचलाय. आता थेट विधानसभेच्या प्रचारासाठी डॉली चायवाला हा मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. चंद्रपूरमध्ये प्रचार करताना डॉली चायवाला दिसला. बल्हारपूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतूरे यांचा प्रचार करताना डॉली चायवाला दिसला. लोकांनी डॉली चायवाला याला बघण्यासाठी मोठी गर्दी देखील केली.
डॉली चायवाला दुर्गापूर, बल्हापूर येथे आला होता. गावतुरे यांचे निवडणूक चिन्ह केतली आहे. हातात चायची केतली घेऊन डॉली चायवाल्याने रोड शो केला. त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. बल्हारपूर मतदार संघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात थेट लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अभिलाषा गावतुरे यांनी त्यांच्या रोड शोसाठी थेट डॉली चायवाला यालाच बोलावले.
मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांची सभा झाली होती. या सभेला मोठी गर्दी झाली. मात्र, डॉली चायवाल्याने पवन कल्याण यांना मात दिल्याची चर्चा रंगली आहे. मुळात म्हणजे डॉली चायवाला त्याच्या खास शैलीमध्ये चहा बनवतो आणि ग्राहकांना देतो. डॉली चायवाल्याचे खास शैलीमध्ये चहा बनवण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात. त्याचा चहा पिण्यासाठी कायमच लोकांची प्रचंड गर्दी असते.