Sanjana Jadhav cries during speech: कन्नडमध्ये संजना यांच्याविरोधात त्यांचे विभक्त पती हर्षवर्धन जाधव अपक्ष रिंगणात आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना कन्नडमधून तिकीट देण्यात आलं.
संजना जाधव काय म्हणाल्या?
माझ्यावर अनेक संकटं आली, पण मी ती आपल्याला बोलून नाही दाखवली नाहीत, कारण ती माझी संस्कृती नाही, माझ्या मायबापाने मला शिकवलं, मी लग्न करुन एका महिन्यात आले, मी काही सांगायला गेले, तर माझे वडील म्हणायचे, तुला एक मूल होऊदे, त्यानंतर हा माणूस सुधरेल, मला मूल झालं, त्यानंतर माझे वडील म्हणाले, चाळीशी झाली की माणूस सुधरत असतो, चाळिशी झाली, त्याच्यानंतर जे सहन केलं, त्याचा मोबदला तर मिळाला नाही, पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं, ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, असं संजना जाधव सांगत होत्या.
Sanjana Jadhav : लग्नानंतर महिन्याभरात माहेरी आले, बाबा म्हणाले तुला मूल होऊदे मग… संजना जाधव ढसाढसा रडल्या
एका मुलीचा बाप शांत बसला
माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, पण तुमच्या हृदयात जी जागा होती, ती जागा कायम राहिली, प्रयत्न होऊनही त्यांना ती घेता आली नाही, माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले, पण आम्ही सहन केले, कारण एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असतात, म्हणून केले. एका मुलाचा बाप जर असता, तर तो रस्त्यावर उतरला असता, परंतु एका मुलीचा बाप यामुळे शांत बसला, असं म्हणतानाच त्या रडू लागल्या.
तुझी तिरडीच आली पाहिजे
प्रत्येक आई-वडील आपल्यावर एकच संस्कार देतात, माझ्या आईने मला सांगितलं, आज तू माझ्या घरातून जात आहेस, तर तू परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे, तू आली नाही पाहिजेस, त्याच्याप्रमाणे मी हा संसार केला. मी आतापर्यंत कधीच रडले नाही, कसली वाच्यता केली नाही, पण हे गाव माझं आहे, त्यामुळे मला भरुन आलं, इथे प्रत्येकाला माहिती आहे, मी काय केलं अन् काय नाही केलं. आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलताय. तुम्ही मला संघर्षकन्या नाव दिलं आहे, पण आता माझी संघर्ष करण्याची ताकद संपली आहे, आता या संघर्षातून तुम्हीच मला बाहेर काढू शकता, असं संजना जाधव म्हणाल्या.