उमेदवाराच्या नावाचा चुकून चुकीचा उल्लेख, विरोधकांकडून गोंधळ; पुण्यातील घटनेनंतर शरद पवार म्हणाले, वडिलांकडून…

Sharad Pawar In Pune : शरद पवार पुण्यात प्रचारसभेत असताना त्यांच्याकडून नावाचा चुकून चुकीचा उल्लेख झाला. यावरुन विरोधकांनी त्यांना घेरत मोठा गोंधळ उडवला. याप्रकरणानंतर शरद पवारांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आदित्य भवार, पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रचारसभांचा धडाका लावला होता. आज बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांच्या तोफेचा शेवटचा आवाज ऐकू येणार आहे. मात्र, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रचारसभेत नावांच्या गडबडीमुळे वाद निर्माण झाला. शरद पवार यांनी सभेदरम्यान “प्रशांत जगताप” याऐवजी “प्रशांत तुपे” असे संबोधले, आणि यावरून विरोधकांनी मोठा गोंधळ उडवला.
Sharad Pawar : शिंदें पिता-पुत्राचा असा पराभव करा की, गद्दारीचं धाडस कोणी करणार नाही; माढ्यातून शरद पवार कडाडले
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून “वस्ताद आशीर्वाद देऊन गेले” अशा प्रकारच्या मजकुरासह मोठ्या प्रमाणात प्रचार केला गेला. मात्र, या संभ्रमावर उत्तर देण्यासाठी शरद पवार यांनी आज ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिले आणि टीकाही केली.
बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत ४० आमदार गेले होते. चेतन तुपेंची भूमिका काही काळ अनिश्चित राहिली होती. लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मात्र, नंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांना समर्थन दिले होते. हडपसर मतदारसंघात त्यांची लीड निश्चित नसल्याने त्यांच्या उमेदवारीवर मोठा पेच निर्माण झाला होता. शेवटी चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाली आणि महायुतीच्या प्रचारासाठी अजित पवार आणि अन्य नेत्यांनी सभांचे आयोजन केले
Praniti Shinde : मुस्लिम उमेदवारीवरुन मतदारांनी प्रणिती शिंदेंना भररस्त्यात घेरले, सडेतोड उत्तर; म्हणाल्या, उमेदवारी दिली असती तर…
त्याचवेळी शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. सभेत त्यांनी चुकून “प्रशांत तुपे” असे म्हटल्याने तुपेंच्या समर्थकांनी तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आणि गोंधळ उडवला.

उमेदवाराच्या नावाचा चुकून चुकीचा उल्लेख, विरोधकांकडून गोंधळ; पुण्यातील घटनेनंतर शरद पवार म्हणाले, वडिलांकडून…

शरद पवार यांचे ट्विट –

“प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या काळात पक्षनिष्ठा सोडली नाही. चेतन तुपे यांनी मात्र फुटीरांना साथ दिली. वडील विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते?’ हे त्यांनी शिकायला हवे होते.”

दरम्यान, मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि जवळपास सर्वच पक्ष अजित पवारांसोबत गेले. शरद पवारांसोबत काही मोजके नेते, कार्यकर्ते राहिले होते. अनेकांनी साथ सोडली असतानाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लोकसभेला मोठा विजय मिळवला. आता विधानसभेलाही जनता शरद पवारांना पाठिंबा देणार की दादांची साथ देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Prashant Jagtapprashant tupePune newspune vidhan sabha newsSharad Pawarपुणे विधानसभा निवडणूकप्रशांत जगतापप्रशांत तुपेशरद पवार
Comments (0)
Add Comment