गुलाबी जॅकेटला तुतारी साडीचा उतारा; भाच्याच्या सांगता सभेसाठी सुप्रिया सुळेंनी परिधान केली लक्षवेधी साडी

Supriya Sule Saree Tutari Design at Baramati Rally: शरद पवार आणि अजित पवार सभेत काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. असे असताना खासदार सुप्रिया सुळेंनी आज परिधान केलेली साडी देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

Lipi

दीपक पडकर, बारामती : आज विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. याच पार्श्वभूमीवरबारामती विधानसभा मतदारसंघात आज दोन्ही पवारांच्या सांगता सभा पार पडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार सभेत काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. निवडणुकच्या प्रचाराच्या या सांगता सभेसाठी उपस्थित राहण्याआधी सुप्रिया सुळे यांनी आज दिवसभरात पाच सभांना संबोधित केले आहे. या सभांमध्ये त्यांनी परिधान केलेली साडी खास आकर्षण ठरत आहे. कारण त्यांनी तुतारीचे चिन्ह असलेली लक्षवेधी साडी परिधान केली आहे.

आज बारामतीतील जुन्या मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टी येथे युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत. त्यांनी या प्रचाराच्या सांगता सभेसाठी खास साडी परिधान केली आहे. ही साडी सभेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
मी पहिल्या टर्मला फक्त आमदार, दुसऱ्या टर्मपासून मंत्री, आता रोहित पवारांना संधी दिली तर… नातवासाठी पवारांची साद
इकडे अजित पवारांनी विधानसभेच्या प्रचारात गुलाबी जॅकेटची थीम आणली आहे. ही थीम घेऊन गेले अनेक महिने अजित पवार हे राज्याच्या विविध भागात फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचीही साडी आज चर्चेचा विषय ठरली.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

baramati vidhan sabha poliicsMaharashtra vidhan sabha nivadnuksharad pawar symbol tutariSupriya Suleyugendra pawar rallyतुतारी चिन्हाची साडीबारामती मतदारसंघातील राजकारणयुगेंद्र पवारांची सांगता सभाशरद पवारांची राष्ट्रवादीसुप्रिया सुळेंची साडी
Comments (0)
Add Comment