काहींना प्रश्न पडलाय, आता मी काय करायचं? शरद पवारांचं दादांना उत्तर, पण ‘ते’ शब्द टाळले

Sharad Pawar: देशात बारामतीची ओळख कोणामुळे आहे ते सगळ्यांना माहीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: देशात बारामतीची ओळख कोणामुळे आहे ते सगळ्यांना माहीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. मी बारामतीत काम केलं. मग अजित पवार आले. त्यांनीही काम केलं. त्यांनी केलेल्या कामाबद्दल माझी तक्रार नाही. पण आता नव्या पिढीकडे सूत्रं सोपवण्याची वेळ आलेली आहे, असं म्हणत पवारांनी युगेंद्र पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. या सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामतीत यंदा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आहे. काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष बारामतीत पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शरद पवारांनी संध्याकाळी सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका करणं टाळलं. माढा, आंबेगावात सभा घेताना शरद पवार अतिशय आक्रमक दिसले. अजित पवारांच्या शिलेदारांवर टीका करताना पवारांनी पाडा, पाडा, पाडा असं आवाहन केलं. पण हेच शब्द शरद पवारांनी बारामतीत टाळले.
Raj Thackeray: राज ठाकरेंसमोर अभूतपूर्व संकट; मनसेची मान्यताच धोक्यात; नियम, अटी काय सांगतात?
‘बारामतीत युगेंद्र पवारांना उमेदवारी दिल्यानंतर काही जण विचारतात आता मी काय करु? त्यांना मला सांगायचंय, मी १९६७ मध्ये आमदार झालो. मग पुढील २० ते २५ वर्षांत मंत्री, मुख्यमंत्री झालो. त्यानंतर नवी पिढी आली. दादा आले. २०-२५ वर्षे त्यांनी काम पाहिलं. ते मंत्री झाले. अनेकदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी काम केलं. त्याबद्दल माझी तक्रार नाही,’ असं शरद पवार म्हणाले.
Maharashtra Election 2024: ठाकरेंचा निष्ठांवत म्हणतो, तो मी नव्हेच! ‘त्या’ पत्रकांमुळे संभ्रम, शिंदेंच्या आमदारावर आरोप
‘माझी पिढी झाली. मग अजित पवारांची पिढी झाली. आता पुढची पिढी युगेंद्रची आहे. त्याच्याकडे मी आता बारामतीची जबाबदारी देतो. तो उच्चशिक्षित, चारित्र्य संपन्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो गावागावात फिरतोय. लोकांशी त्याचा संवाद, संपर्क चांगला आहे. आपल्याला मतदारसंघात नेमकं काय करायचं आहे ते समजून घेतोय. आम्ही ज्या कष्टानं बारामतीचा विकास केला, त्यापेक्षा जास्त मेहनत युगेंद्र घेईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही,’ असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarmaharashtra assembly electionMaharashtra politicsncpअजित पवारबारामती विधानसभामहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकयुगेंद्र पवारशरद पवार
Comments (0)
Add Comment