राहुल कुल यांना विजयाचं गिफ्ट द्या, मग त्यांना मंत्रीपद… देवेंद्र फडणवीसांचे दौंडमध्ये जोरदार भाषण

Devendra Fadnavis Appeal About Rahul Kul to Voters: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दौंड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्यासाठी सभा घेतली आहे. यावेळी फडणवीस यांनी जाहीर सभेत दौंडच्या नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Lipi

आदित्य भवर, पुणे : विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचारतोफा धडाडत आहेत. बारामती मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांच्या सांगता सभा पार पडल्या आहेत. तर दौंड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्यासाठी सभा घेतली आहे. यावेळी फडणवीस यांनी जाहीर सभेत दौंडच्या नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राहुल कुल यांना २० हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले, तर त्यांना कॅबिनेट मंत्री केले जाईल; अन्यथा राज्यमंत्री पद दिले जाईल.

दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाविरोधात भाजपची थेट लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाकडून उमेदवारी कोणाला दिली जाईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पक्षांतर्गत चुरशीदरम्यान अजित पवार गटातील रमेश अप्पा थोरात यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी उफाळून आली होती. मात्र, अजित पवार यांनी काल सभा घेत उमेदवारासाठी पाठिंबा मागितला, तर फडणवीस यांनी आजच्या सभेत भाजप उमेदवार राहुल कुल यांच्या समर्थनार्थ जोरदार भाषण केले आहे.
जनतेची फसवणूक करणाऱ्यांना जेलमध्ये टाकेन, फडणवीसांचा कोणाला टोला? भर सभेत म्हणाले…
फडणवीस म्हणाले, ‘मतदानाच्या दिवशी जोरदार बटण दाबून राहुल कुल यांना विजयाचं गिफ्ट द्या. मुंबईला अरबी समुद्र दिसतो, पण दौंडमध्ये माणसांचा महासागर आहे. राहुल कुल त्यांच्या नावाप्रमाणेच शांत आणि स्थिर आहेत. मी ठरवले आहे, २० हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवल्यास त्यांना कॅबिनेट मंत्री करणार, नाहीतर राज्यमंत्री पद मिळेल.’

मतदानाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. या निवडणुकीवर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येणार की सत्तापालट होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अनेकांचं भवितव्य ठरवणारी ही अटीतटीची निवडणूक आहे. महाराष्ट्राची जनता आता कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

daund vidhan sabhaDevendra FadnavisMaharashtra vidhan sabha nivadnukmahayuti in MaharashtraRahul Kulदेवेंद्र फडणवीसांचे भाषणदौंड विधानसभेतील राजकारणमहायुती सरकारराहुल कुल यांची प्रचारसभाविधानसभा निवडणुकीच्या घडामोडी
Comments (0)
Add Comment