Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा सोमवारी थंडावल्या. कोकणातील अनेक मतदारसंघात अखेरच्या दिवशी सर्वांनी जोरदार प्रचार केल्याचे दिसून आले.
अजित दादांचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासमोर असलेले चिपळूण मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी देवरुख येथे जोरदार रॅली काढली. दापोलीचे महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम व पत्नी श्रेया कदम यांच्या उपस्थितीत खेडमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. दापोली येथेही योगेश कदम यांच्यासाठी रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर यांचीही मोठी प्रचार रॅली काढण्यात आली. गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राजेश बेंडल यांच्या हातात हात घालून भाजपाचे माजी आमदार डॉ. यांनी रॅली काढत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वाडी वस्तीवर भेटीगाठीवर भर दिल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
सामंत बंधूंसाठी आई-वडील सरसावले
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मंत्री उदय सामंत व राजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्यासाठी आई-वडील यांनी माध्यमांसमोर येत दोन्ही मुलांना निवडून आणण्याच आवाहन केल. राजापूरमधून किरण सामंत व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री उदय सामंत या दोन्हीही आपल्या मुलांना आई सौ. स्वरूपा व वडील रवींद्र उर्फ आरडी सामंत यांनी आपणही लोकल असून आपल्या दोन्ही मुलांची काम करण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे असे शब्दात दोघांचेही कौतुक करत या आपल्या दोन्ही मुलांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांनीही राजापूर तालुक्या पाचल इथे जोरदार रॅली काढून प्रचाराची सांगता केली.
दरम्यान कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार व विद्यमान उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंची घराणेशाही लोकांना मान्य नाही असा सवाल करत थेट महायुतीच्या उमेदवारांनाच आव्हान दिलं. भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांनीही कुडाळ मालवण मतदारसंघात या आमदाराने कोणतेही विकासाचे काम केलं नाही असं सांगत परिवर्तनाची हाक देत वैभव नाईक यांना सुनावले आहे. रायगड जिल्ह्यात महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांचीही भव्य रॅली महाड येथे काढण्यात आली महाड मतदारसं महाविकासासाठीकडून शिवसेनेचे ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी गोगावले यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.