अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर महायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Anil Deshmukh Attacked Case : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याला अद्याप २४ तास पूर्ण झाले नाहीत. आता महायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमरावती : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असताना अशा प्रकारे हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. देशमुखांवर यांच्यावर झालेला हल्ला सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट असल्याचे भाजपने म्हटलं आहे. तर हा हल्ला भाजपकडून करण्यात आल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे. या घटनेला असून २४ तास झाले नसताना महायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आलीय.

धामणगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ फाट्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे या मतदार संघात प्रचार करून परतत असतांना मतदार संघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केल्याचे समजते. या हल्ल्यात अर्चना रोठे यांच्या हाताला गंभीर घाव झाल्याचे समजते. त्यांची गाडी क्रमांक एम.एच. २७ डी.बी. ५००१ या गाडीचे समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे.

हल्ला करून हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी यांनी सांगितले. घटनेनंतर अर्चना रोठे यांना चांदूर रेल्वे शहरातील डॉ. क्रांतिसागर ढोले यांच्या खाजगी दवाखान्यात आणून प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती पाठवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन एकच गर्दी केली होती. सदर घटनेचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात जर उमेदवारांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर निकालानंतर राज्यातील परिस्थिती कशी असेल. असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

Source link

anil deshmukhanil deshmukh latest newsअनिल देशमुखअनिल देशमुख मराठी बातम्याअनिल देशमुख हल्लामहायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला
Comments (0)
Add Comment