Pune-दोन आरोपींकडून एकुण ०२ गावठी पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे व ०१ मोबाईल जप्त काळेपडळ पोलीस ठाणे

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

पुणे Online News : महाराष्ट्र राज्य विधान सभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचासंहिताच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणेपुणे शहर श्री. मानसिंग पाटील यांचे आदेशांन्वये काळेपडळ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस अमंलदार असे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पो. अमंलदार दाऊद सय्यद व अतुल पंधरकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काळेपडळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १) रितेश बाबासाहेब कसबे, वय १८ वर्ष रा. साठेनगर, तरवडेवस्ती, महंदवाडी रोड, हडपसर, पुणे २) राहुल संजय चौधरी वय २१ वर्ष रा. हडपसर पुणे याचे सोबत देसाई हॉस्पीटचे पाठिमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ दोघे दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तु बाळगुन वावरत असुन संशयित चीज वस्तुही अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे.

असे बातमी मिळताच, सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे यानी सदर बातमीबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मानसिंग पाटील यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरी. अमित शेटे व वरील पोलीस स्टाफ असे देसाई हॉस्पीटलच्या मागे, पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या कडेला सर्व टिमला दिलेल्यां सुचनां प्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रितेश बाबासाहेब कसबे, हा त्याचा सोबतचा असणारा मित्र हे पोलीसांना पाहून संशयितरित्या आढळुन आलेने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता इसम नामे रितेश बाबासाहेब कसबे याच्या कमरेच्या उजव्या बाजूस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळुन आलेल्या अग्नि शस्त्राची मॅगझीन काढुन पाहता त्या मॅगझिन मध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आले तसेच राहुल संजय चौधरी याच्या कमरेस डाव्या बाजुस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टचे डाव्या खिशात एक मोबाईल फोन व उजव्या खिशात दोन जिवंत काडतूस मिळुन आले. सदरचे पिस्टल हे ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांचे ताब्यात मिळुन आलेले अग्निशस्त्र व जिवंत काडतुसा बाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगुन त्याने साठेनगर, तरवडेवस्ती परीसरात दहशत करणेकामी सदरचे पिस्टल हे आपण जवळ बाळगल्याची कबुली दिली.

तरी नमूद इसमां कडून दोन लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुस सोबत एक मोबाईल फोन हे दहशत करणेचे उद्देशाने विनापरवाना, बेकायदेशिर व अनधिकृतरित्या आपले कब्जात बाळगले असताना मिळून आल्याने नमूद इसमां विरुध्द काळेपडळ (वानवडी) पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे ताब्यातून दोन लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुस सोबत एक मोबाईल फोन असा एकुण ९०,८००/- रुपये किं. चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील दोन्ही आरोपीत इसमांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर श्री. आर. राजा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे, श्री. धन्यकुमार गोडसे, यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, यांचे सुचनेप्रमाणे सहा, पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस अमंलदार दाऊद सय्यद, अमोल काटकर, परशुराम पिसे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंघरकर, सुर्यवंशी यांचे पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment