Kishori Pednekar on Raj Thackeray : तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का? असे प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले.
किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलंत, तुमची पण बायको आता एक सासूच आहे. कुठूनही फिरुन एका स्त्रीचीच बदनामी करताय, तुम्ही बदनाम करणारे कोण? खाष्ट सासू म्हणजे काय? तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का? असे प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले.
अनुभवा शिवाय कोण बोलत नाही. आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही, आम्हाला प्रेमळ सासू मिळाली, त्यामुळे खाष्ट सासू घरात आहे, तो अनुभव घेऊन तुम्ही उद्धवजींच्या स्वभावाचं मीलन करत असाल, तर घरातूनच सुरुवात आहे, घरातच सुनेला जाच आहे, खाष्ट सासू म्हणून हिणवणं, हा स्त्रियांचाच अपमान आहे, ते पण वयस्क स्त्रियांचा अपमान आहेस, अशी टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली.
भाषणांमध्ये विसंगती
राज ठाकरे यांनी शेवटच्या टप्प्यात म्हटलेलं हे वाक्य आहे. सुरुवात झाल्यापासून राज ठाकरेंची भाषणं पाहिली तर आज काय बोलले ते काल माहिती नाही नि उद्याही माहिती नाही. म्हणजे विसंगत, एका विषयाला धरुन बोलणंच नाही, महाराष्ट्रात काय करणार त्याची माहितीच नाही, तुमचे उमेदवार तुम्ही उभे केले काय आणि मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं बघताय? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला.
त्यांना ना शिंदेंनी सपोर्ट केला ना भाजपने.. उघड उघड- हे जोपर्यंत वाक्य बोलत नाहीत, तोपर्यंत अंदर का सपोर्ट मिळत नाही. म्हणून इतक्या वर्षांनी झालेला साक्षात्कार, त्यांनी मुलाला निवडून आणण्यासाठी, लोकांनी मदत करण्यासाठी, भाजप किंवा शिंदे गट, कारण एक समीकरण झालंय, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलल्याशिवाय प्रमोशनच होत नाही, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.