नालासोपाऱ्यात विधानसभा निवडणुकीआधी मोठा गोंधळ उडाला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरून हॉटेलमध्ये चार तासांहून अधिक काळासाठी अडकवून ठेवले होते. प्रकरणाची दखल घेत महाविकास आघाडीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशातच आता बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
बहुजन विकास आघाडीचे डहाणू येथील उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. सुरेश पाडवी यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एक दिवस बाकी असताना पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. डहाणूमध्ये भाजपकडून विनोद मेढा, विनोद निकोले कम्युनिस्ट पार्टी, विजय वाढिया मनसे, संतोश ठाकरे बसपा, कल्पेश बाळू भावर अपक्ष, मीना भड अपक्ष हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
नालासोपाऱ्यामध्ये मोठा राडा
नालासोपाऱ्यामध्ये विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना जवळपास चार तास अडकवून ठेवलं होतं. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला गेला. यादरम्यान बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बराच वेळ तावडे यांनी कोणासोबतही संपर्क साधला नाही. त्यावेळी माफ करा, चुकलं जाऊ द्या म्हणत मला २५ फोन केल्याचं हिंतेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. काही वेळानंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली मात्र निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली नाही. काही वेळाने ठाकूर पिता-पुत्र विनोद तावडे यांना आपल्यााच गाडीत घेऊन निघून गेले. मात्र या प्रकरणावरून महाविकास आघाडीने भाजपला धारेवर धरलं आहे.