Surya Gochar 2024 : सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश ! मेषसह या 5 राशींची भरभराटी, व्यवसायात लाभ, करिअरमध्ये भरारी !

Sun Nakshatra Transit 2024 :सूर्याने मंगळवारी दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला आहे. अनुराधा नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून सूर्य विशाखा नक्षत्रातून बाहेर येऊन सूर्याने अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला आहे. सूर्य आणि शनि यांच्यातील संबंध शत्रूत्वाचे आहे पण सध्या सूर्य वृश्चिक राशीत बुधसोबत बुधादित्य राजयोग बनवत आहे. यामुळे सूर्य शनीच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने शुभ प्रभाव दिसत आहेत. 2 डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात सूर्याचे संक्रमण असेल. हे संक्रमण कन्यासह पाच राशींना लाभदायक असेल, करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात लाभ, परिक्षेत यश आणि शत्रूचा संहार होईल. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशींना फायदा होईल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Surya Gochar 2024 : सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश ! मेषसह या 5 राशींची भरभराटी, व्यवसायात लाभ, करिअरमध्ये भरारी !

Surya Nakshatra Gochar 2024 : 2 डिसेंबरपर्यंत सूर्य अनुराधा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. अनुराधा नक्षत्र 27 नक्षत्रांपैकी 17वे नक्षत्र आहे आणि त्याचे स्वामी शनिदेव आहेत. पुत्र शनिदेवांच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश म्हणजे काही राशींनी सावध रहावे तर कन्यासह या राशींना भरपूर फायदा होणार आहे. सुख समृद्धीचे योग असून करिअरमध्ये शानदार प्रगती असेल. चला तर मग त्या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेवूया.

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा मेष राशीवर प्रभाव

सूर्याचे हे संक्रमण नवविवाहितांसाठी गुड न्यूज घेवून येणार आहे. संतान प्राप्तीचा योग असून घरी आनंदी वातावरण असेल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हे परिवर्तन आर्थिक लाभ देणारे असेल. पद प्रतिष्ठा यात वाढ असून जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. तुम्ही मेहनतीने प्रत्येक गोष्ट प्राप्त कराल. प्रवासाचा योग असून घरात वातावरण आनंदी असेल.

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा मिथुन राशीवर प्रभाव

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे परिवर्तन जीवनात प्रगती आणि भरभराट घेवून येणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळविण्यासाठी तुम्ही योजना आखाल आणि त्यात यशस्वी व्हाल. परदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रवासात लाभ आहे त्यामुळे नक्की प्रवास करा. तब्येतीची काळजी घ्यावी. जे लोक प्रॉ़पर्टीचे काम करतात त्यांना लाभ होईल.

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा कन्या राशीवर प्रभाव

सूर्याचे हे संक्रमण तुम्हाला कठीण परिस्थितीत यश मिळवून देईल. तुम्ही मेहनतीने आणि धैर्याने सगळं काही शक्य करू शकाल. तुम्ही जे काही महत्त्वाचे काम करणार आहेत त्याबद्दल कोणाला ही सांगू नका. गुप्तपण कामे करा ती नक्की यशस्वी होतील. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, तुम्ही पार्टनरसोबत मिळून काही गुंतवणूक केल्यास त्यात चांगला नफा होईल.

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा धनु राशीवर प्रभाव

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव धनु राशीच्या लोकांवर संमिश्र असेल. शत्रूंवर विजय मिळवाल. तसेच कोर्ट कचेरीची कामे होतील तसेच कायेदशीर वादात तुमच्या बाजूने निकाल लागेल. आर्थिक स्थिती चांगली असून कार्यक्षेत्रातही तुमच्यासाठी उत्तम काळ आहे. तुमची प्रगती होईल आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय पुढे जाण्यात यशस्वी व्हाल.

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा मीन राशीवर प्रभाव

सूर्याच्या प्रभावामुळे धार्मिक कार्यात तुमची रूची अधिक वाढेल. पूजा किंवा मंगलकार्य करण्याचे अनेक योग येतील. तसेच तुम्ही मंगलकार्यात सहभागी व्हाल. सामाजिक कार्यातही तुमचा सक्रिय सहभाग असेल. मानसिक समाधान असून ताणतणाव कमी होईल. तुमच्या निर्णयाचे कौतूक होणार असून सरकारी नोकरी मिळण्याचे योग आहेत. या कालावधीत मीन राशीचे जे विद्यार्थी परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळेल.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Sun Nakshatra Transit 2024Surya Gochar 2024Surya Nakshatra Gochar 2024करिअरमध्ये प्रगतीव्यवसायात लाभसूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश
Comments (0)
Add Comment