विनोद तावडेंना तात्काळ अटक करा, पराभवाच्या भितीने भाजपाकडून पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा आरोप

Ramesh Chennithala On Vinod Tawde : विनोद तावडेंना मतदारांना पैसे वाटताना पकडलं, त्यानंतर एकच राडा झाला. आता काँग्रेसकडून यावर टीका होत असून निवडणूक आयोगाने तावडेंसह भाजपावरही कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्याने केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्‌या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई – विरारमध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.
आम्ही व्यवसाय करतो, त्याचा कर भरतो त्यामुळे… शरयू टोयोटातील सर्च ऑपरेशननंतर श्रीनिवास पवार म्हणाले…
या संदर्भात बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरू आहे. आज वसई विरार येथे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळावरून १० लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पण अद्याप तावडे यांना अटक केली नाही.
Pratibha Dhanorkar : माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा… खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला खुली धमकी, व्हायरल व्हिडिओची चर्चा
प्रचार संपल्यानंतर नियमानुसार मतदारसंघाच्या बाहेरची व्यक्ती थांबू शकत नाही, पण तावडे यांनी वसई विरारला जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच आचारसंहिता भंग केल्याचे मान्य केले आहे. प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे.
उमेदवाराच्या नावाचा चुकून चुकीचा उल्लेख, विरोधकांकडून गोंधळ; पुण्यातील घटनेनंतर शरद पवार म्हणाले, वडिलांकडून…
फक्त वसई विरारच नाही तर राज्यभरात भाजपा आणि महायुतीकडून पैसे वाटून जनमत विकत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यभरात सुरु असलेल्या पैसे वाटपावर कारवाई करून पैसे वाटणा-यांना अटक करावी तरच निष्पक्ष निवडणुका पार पडतील असे चेन्नीथला म्हणाले.

विनोद तावडेंना तात्काळ अटक करा, पराभवाच्या भितीने भाजपाकडून पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा आरोप

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला. चार तास तावडे हॉटेल विवांतामध्ये होते. त्यानंतर तावडे पिता-पुत्रासह बाहेर पडले. काही वेळानंतर दोघांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली, मात्र निवडणूक आयोगाने परवानगी दिली नाही. या संपूर्ण प्रकणावरुन महाविकास आघाडीने भाजपला धारेवर धरलं आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

congress ramesh chennithalaVidhan Sabha Nivadnukvinod tawdeरमेश चेन्नीथलावसई विरार विनोद तावडेविधानसभा निवडणकूविनोद तावडे
Comments (0)
Add Comment