भाजपमधील कोणच्या नेत्यानं टिप दिली? तावडेंचा आवाज चढला; दोन वाक्यांत विषय संपवला

Vinod Tawde: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना आज विरारच्या विवांता हॉटेलात गाठलं. त्यांच्या बॅगेत पैसे, डायऱ्या सापडल्या. त्यानंतर तब्बल सहा तास तणावपूर्ण परिस्थिती होती. आता या सगळ्यावर तावडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजपच्याच नेत्यांनी दिली होती, असा दावा करत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी एकच खळबळ उडवून दिली. त्यावर तावडेंनी भाष्य केलं. ‘हितेंद्र ठाकूरांनी म्हटलं भाजप नेत्यानं टिप दिली. ते धादांत खोटं आहे. नंतर ते कारमध्ये बसल्यावर मला काय म्हणाले, तेदेखील मला माहीत आहे. त्यामुळे भाजप नेत्यानं टिप दिल्याच्या दाव्यात तथ्य नाही,’ असं तावडें पत्रकारांना सांगितलं.
Rahul Gandhi: मोदीजी, तुम्हाला ५ कोटी टेम्पोतून कोणी पाठवले? तावडे तावडीत सापडताच राहुल गांधींचा थेट सवाल
तुमची टिप कोणी दिली असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न विचारताच तावडेंचा आवाज चढला. या प्रकरणात टिप देण्यासारखं काही नव्हतंच. मग टिपचा प्रश्न येतो कुठून असा उलटप्रश्न तावडेंनी केला. केंद्रीय भाजपकडून काही संपर्क साधण्यात आला का, असा प्रश्न तावडेंना विचारण्यात आला. त्यावर कोणीही संपर्क साधलेला नाही. कोणी स्पष्टीकरण मागितलेलं नाही, असं तावडे म्हणाले.

तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यानं हा प्रकार मुद्दाम घडवून आणण्यात आला का, असा सवाल तावडेंना विचारला गेला. त्यावर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीबद्दल मी आधीच म्हटलंय ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र. मी विरारला जाणार असल्याचं पक्षातल्या कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे अडकवण्याचा विषय येतच नाही, असं तावडेंनी सांगितलं.
Vinod Tawde: शिल्पा शर्मा ३००, टीना जैन ३००, पूर्णिमा पुजारी ३००; तावडेंकडे सापडलेल्या डायरीत कोणाची नावं?
पैसे वाटप केल्याचा आरोप संपूर्णपणे चुकीचा असल्याचं तावडेंनी म्हटलं. ‘त्यांना (ठाकूर आणि बविआच्या कार्यकर्त्यांना) शंका आली असेल म्हणून त्यांनी केलं. निवडणूक आयोगानं चौकशी करावी. या प्रकरणात तीन एफआयआर झाले आहेत. आम्ही दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, म्हणून एक एफआयआर झाला. मी मतदारसंघ नसताना तिकडे गेलो. त्यामुळे दुसरा एफआयआर नोंदवला गेला आणि हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिकडे आले. या कारणामुळे तिसरा एफआयआर झाला. पैशांचा एकही आरोप नाही. एफआयआर नाही. पैशांविषयीच्या बातम्या खोट्या आहेत. त्यात काहीच तथ्य नाही, असं तावडेंनी सांगितलं.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpmaharashtra assembly electionMaharashtra Political NewsMaharashtra politicsपैसे वाटल्याचा आरोपबहुजन विकास आघाडीमहाराष्ट्र राजकीय बातम्याविधानसभा निवडणूकविनोद तावडेहितेंद्र ठाकूर
Comments (0)
Add Comment