tiger attack: ताडोबात वाघाचा हल्ल्यात एक ठार; या वर्षात आतापर्यंत २१ जणांचा बळी

हायलाइट्स:

  • ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन क्षेत्रात मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या आंबेगड नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३८ मध्ये वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली.
  • सदर घटना शनिवारी उघडकीस आली. भारत रामा बावणे (६५) असे मृतक व्यक्तीचे नाव असून ते शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता होते.
  • वावणे हे बांबू तोडीसाठी जंगलात गेले होते.

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन क्षेत्रात मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या आंबेगड नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३८ मध्ये वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी उघडकीस आली. भारत रामा बावणे (६५) असे मृतक व्यक्तीचे नाव असून ते शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता होते. बावणे हे बांबू तोडीसाठी जंगलात गेले होते. (one lost life in tiger attack in tadoba in chandrapur)

…आणि गावकऱ्यांनी टाकला सुटकेचा नि:श्वास

सिंदेवाही वनपरिक्षेत्र गुंजेवाही उपक्षेत्रातील पवनपार नियतक्षेत्रालगत असलेल्या साई राईस मिलच्या मागील झुडपात वाघिणीने आपल्या दोन बछड्यांसह शनिवारी सकाळी दर्शन दिले. गावकरी भयभीत झाले. तिथे वनविभागाच्या पथकासह ‘रॅपिड रिस्पॉन्स युनिट’ला पाचारण करण्यात आले. या भागातून वाघिणीसह बछड्यांना हुसकावून लावण्यात वनविभागाला यश आले असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

क्लिक करा आणि वाचा- अवयवदान: कापसे कुटुंबा़तल्या ‘प्रकाशा’ने तिघांचे आयुष्य उजळणार

गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये सध्या तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याची घटना घडली होती. यात या व्यक्तीला प्राण गमवावे लागले होते. भाऊराव दोडकू जांभूळे (वय ४२) असे मृत्यू झालेल्याचे नाव होते. या घटनेनंतर गावकऱ्यांना जंगलात जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. वन विभागाने परिसरात गस्ती पथक नेमले देखील नेमले होते. शिवाय मृताच्या नातेवाइकांना तातडीची मदत देण्यात आली होती.

क्लिक करा आणि वाचा- करोना: आज राज्यात १०,६९७ नव्या रुग्णांचे निदान, ३६० मृत्यू

दरम्यान, आजच्या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षांत वन्यजीवांच्या हल्ल्यांत ठार झालेल्यांची संख्या एकवीसवर पोहचली आहे.

क्लिक करा आणि वाचा- आएगी याद तुझे मेरी… मुलाला गायक बनवण्याचं स्वप्न भंगलं

Source link

chandrapurone killed in tiger attacktadobatiger attackचंद्रपूरताडोबावाघाचा हल्लावाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment