राज्यात आज मतसंग्राम! ४१३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात आज, बुधवारी मतदान होत असून लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. एक लाखाहून अधिक मतदारकेंद्रांत होणाऱ्या या मतदानासाठी तब्बल चार हजार १३४ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतपेटीत बंद होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
vote 1600

मुंबई : सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीसाठी निकराची लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत आहे. देशातील आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवायची याचा राज्यातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक मतदारांचा फैसला मतदानयंत्रात बंद होणार आहे.

महायुती, महाविकास आघाडी आणि छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची तसेच त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी वाजल्यापासून राज्यभरात एकाचवेळी मतदानाला सुरुवात होईल. मतदान प्रक्रिया मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण सज्जता केली आहे. मात्र, मतदानाच्या काही तास अगोदर राज्यात घडलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटना आणि मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे घडलेले प्रकार लक्षात घेता निवडणूक आयोगासमोर निवडणुका शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचा पट बदलला. २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु, एकनाथ शिंदे यांनी जून २०२२मध्ये बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, पढे शिंदेंच्या नेतृत्वात युतीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली. या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभेसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्या महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यासारख्या छोट्या-मोठ्या पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरू पाहत आहे.
Nandurbar News: असह्य वेदना, रस्ता नसल्यानं गर्भवतीसाठी केली बांबूची झोळी; पण रुग्णालय गाठण्याआधीच…
पक्षफुटीचा तडाखा सहन करावा लागलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागला आहे. त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांना धडा शिकविण्यासाठी दोघांनीही कंबर कसली आहे. शरद पवार यांची बारामती विधानसभा मतदारसंघात कसोटी लागली आहे. पुतण्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आव्हान परतून लावण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावला आहे. बारामतीत शरद पवार गटाचे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होत आहे.

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील याचिका प्रलंबित असताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयातील लढाईत पूर्ण शक्ती लावली आहे. आघाडीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसला राज्याच्या सत्तेत पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
कैलास गेहलोत अखेर भाजपमध्ये; ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीत सार्वधिक जागा लढवत असून दोन वेळेला मुख्यमंत्रिपदाची संधी हुकलेल्या फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची बनली आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी निर्णायक आमदार निवडून आणण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रणनीती आखली आहे. तर, विधानसभा निवडणुकीनंतर संधी मिळाली तर किंगमेकरच्या भूमिकेत राहता यावे यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. त्यामुळे महायुतीच्या या तिन्ही नेत्यांसाठी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे.

एकूण जागा २८८
एकूण उमेदवार ४,१३६
एकूण मतदार ९,७०,२५,११९
राज्यातील संवेदनशील ९९० मतदान केंद्रे
सरासरी मतटक्का २०१९
राज्य ६१.४४%
मुंबई ४९.९%
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६

भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
आपले मत, अमूल्य मत
मुंबईसह राज्यात आज, बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे; आणि त्याचबरोबर कर्तव्यही. आपल्या हक्काची जाणीव ठेवून मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायला हवे. ‘आपल्या एका मताने काय फरक पडतो’, असे म्हणत मतदान टाळू नका. आपल्या नियमित कामाचे वेळापत्रक पाळूनही मतदान करता येणे शक्य आहे. आवश्यक ती कागदपत्रे बरोबर बाळगा आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, आपल्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून मतदान करा आणि आपली लोकशाही सबळ, सुदृढ करण्यास साह्य करा.
नऊ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या; सांताक्रूझमध्ये दुकानाच्या छतावर आढळला मृतदेह, घटनेनं खळबळ
राजकीय वारसदारांसाठी निकराची लढाई मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश आणि नितेश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित, काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचे चिरंजीव आशीष, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष, खासदार संदिपानराव भुमरे यांचे चिरंजीव विलास, माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर अशा सर्व राजकीय वारसदारांसाठी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionsmaharashtra election commissionmaharashtra votesraj thackerayshiv senaVidhan Sabha Elections 2024महायुतीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघमहाविकास आघाडीमुंबई बातम्या
Comments (0)
Add Comment