Hitendra Thakur Lucky Shirt on Voting Day: ”जेव्हापासून मला मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून मी न चुकता मतदान करत आहे. सध्या जे राजकारण सुरु आहे ते मला आवडत नाही. पैसे वाटणे, कुटुंबियामध्ये फूट पाडणे, पक्षामध्ये फूट पाडणे असं सगळं सुरु आहे”.
हायलाइट्स:
- पैसे वाटणं, पक्ष फोडने, कुटुंब फोडणे घर फोडणे योग्य नाही
- गेल्या पाच वर्षापासून राजकारण हे अतिशय घृणास्पद
- जास्तीत जास्त मतदान करुन योग्य उमेदवार निवडणूक आणणे गरजेचं आहे
हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा १९९० साली विधानसभा निवडणुकीत वयाच्या २९व्या वर्षी काँग्रेसकडून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा आपला राजकीय पक्ष स्थापन केला, जो बहुजन विकासात आघाडीत नंतर बदलला गेला. त्यानंतर बहुजन विकास आघाडीकडून तीनवेळी ते निवडून विधानसभेत गेले आहेत.
हितेंद्र ठाकूरांचीही मोठी खेळी, आदल्या रात्रीत गेम फिरवला
दरम्यान, बहुजन विकास आघाडी पक्षाचे (बविआ) डहाणू मतदारसंघातील उमेदवार सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. तसेच या निवडणुकीत मतविभाजनाचा फटका योग्य उमेदवाराला बसू नये, यासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला,’ असे पाडवी यांनी म्हटले आहे. विरार येथे घडलेल्या प्रकारानंतर भाजपने बविआला शह देण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा आहे. त्यानंतर बहुजन विकास आघाडीनेही तात्काळ निर्णय घेतला. डहाणू विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीतर्फे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना पाठिंबा दिला आहे.