‘प्लॅनेट मराठी’विरोधात फसवणुकीची तक्रार; १ कोटींहून अधिक रक्कम थकवल्याचा आरोप, चेकही झाले बाऊन्स!

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 20 Nov 2024, 2:44 pm

Planet Marathi OTT Akshay Bardapurkar: अभिनेता आयुष शाह व त्याची व्यावसायिक बहीण मौसम शाह यांनी ‘प्लॅनेट मराठी’ तसेच या ओटीटी प्लॅटफार्मचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर व व्यंकटरमन दीपक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
ayush shah

मुंबई : कर्जरूपाने घेतलेले पैसे परत केले नाहीत आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेले धनादेशही वटले नाहीत, असा आरोप करत अभिनेता आयुष शाह व त्याची व्यावसायिक बहीण मौसम शाह यांनी ‘प्लॅनेट मराठी’ तसेच या ओटीटी प्लॅटफार्मचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर व व्यंकटरमन दीपक यांच्याविरोधात गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण?
‘पैशांची गरज आहे. त्यामुळे कर्जरूपाने पैसे द्यावेत. त्याची परतफेड चांगल्या दराने व्याजासह करू, असे म्हणत बर्दापूकर यांनी जून-२०२२ ते मार्च-२०२४ या कालावधीत माझ्याकडून ८७ लाख रुपये कर्जरूपाने घेतले. तर मौसमकडून २० लाख रुपये घेतले. व्याज म्हणून दरमहा तीन लाख ६१ हजार पाचशे रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र, मे महिन्यानंतर त्यांनी ती रक्कम देणे बंद केले. तसेच नंतर संपर्क केला असता प्रतिसाद देणेही बंद केले. म्हणून या क्षेत्रात चौकशी केली असता त्यांची कंपनी प्रचंड तोट्यात गेली असल्याचे आम्हाला कळले. म्हणून बर्दापूरकर यांच्या अंधेरीमधील कार्यालयात जाऊन भेट घेतली.
फुप्फुसात ५० सिगारेटचा धूर; दिल्लीतील प्रदूषणाची पातळी भयावह, AQI ५००च्या घरात
त्यांनी कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी एक कोटी १४ लाख ३० हजार ४०० रुपये या एकूण मूल्याचे अनेक धनादेश दिले होते. मात्र, ते धनादेश वटले नाहीत. परिणामी आमची आर्थिक फसवणूक झाली आहे’, असे आयुषने अॅड. कृष्णगोपाल त्रिपाठी यांच्यामार्फत नीगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याच्या कलम १३८ अन्वये दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Source link

Actor Aayush Shahnegotiable instruments actplanet marathi caseplanet marathi ottplanet marathi upcoming web seriesअक्षय बर्दापूरकरप्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममौसम शाह
Comments (0)
Add Comment