Baramati Vidhan Sabha Nivadnuk : बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला असून यामुळे मतदान बुथवर एकच गोंधळ झाला होता. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं सांगितलं आहे.
अजित पवार काय म्हणाले..?
सदर केलेला आरोप हा धादांत खोटा आहे. तसं झालेले असेल तर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते रेकॉर्ड झालेले असेल. निवडणूक आयोग बघेल. आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या. मात्र कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने कधीही वक्तव्य केलेली नाहीत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रमध्ये राहत असून, सुसंस्कृतपणा दाखवतो. शाहू, फुले, आंबेडकरांची आमची विचारधारा आहे. त्यामुळे माझा कार्यकर्ता असं करणार नाही, असा माझा माझ्या कार्यकर्त्यांवर ठाम विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
Baramati News : बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा; बुथवर येणाऱ्या मतदारांच्या हातामध्ये….शर्मिला पवारांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
शर्मिला पवार काय म्हणाल्या…?
मला कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं की, आम्हाला दबाव येत आहे. दमदाटी केली जात आहे. जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. आमच्या लोकांची तक्रार करू नको असाही दम दिला जात आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांकडे घड्याळ चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या मला या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. सदर चिठ्ठ्या शर्मिला पवारांनी मीडिया समोर दाखवल्या. याबाबत आम्ही संबंधितांकडे लेखी तक्रार करणार आहोत. तसेच धमकी देण्याबाबतही तक्रार करणार आहोत. धमकी देणारे येथील स्थानिक पदाधिकारी, नेते आहेत. त्यांची नावे लवकरच समोर येतील, असं शर्मिला पवार म्हणाल्या.