शरद पवारांच्या नेत्याला मारहाण; भडकलेल्या कार्यकर्त्यांनी EVM फोडले; धनंजय मुंडे संतापले

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांच्या गावात या घटनेचे पडसाद उमटले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड: परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांच्या गावात या घटनेचे पडसाद उमटले. घाटनांदूरमधील मतदान केंद्रात घुसून तोडफोड करण्यात आली. या घटनेनं परिसरात तणावाची परिस्थिती आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाली. बँक कॉलनी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर जाधव यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जाधव यांच्या घाटनांदूर गावात या घटनेचे पडसाद उमटले. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
Maharashtra Election Voting: तुमचं दोन ठिकाणी मतदान आहे का?; प्रश्न ऐकताच तरुणीच्या चेहऱ्याचा रंग उडाला; काढता पाय घेतला
परळीत यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून धनंजय मुंडे, तर शरद पवारांच्या पक्षाकडून राजासाहेब देशमुख रिंगणात आहेत. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. परळीतील बँक कॉलनी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .

माधव जाधव मूळचे घाटनांदूरचे आहेत. त्यांना मारहाण झाल्याचे पडसाद घाटनांदूरमध्ये उमटले. जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील मतदान केंद्रात घुसून तोडफोड केली. त्यांच्याकडून मशीन फोडण्यात आली. त्यामुळे काही वेळ मतदान थांबवण्यात आलं. पोलिसांची मोठी कुमक गावात दाखल झाली. एसआरपीएफची तुकडी घाटनांदूरमध्ये तैनात करण्यात आली.
Vinod Tawde: ज्या तावडेंवर आरोप, त्यांच्याच सोबत कार प्रवास कसा?; ठाकूरांनी स्टार्ट टू एंड स्टोरी सांगितली
छोटी बाजारपेठ असलेल्या घाटनांदूरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. थांबवण्यात आलेलं मतदान आता सुरु करण्यात आलं आहे. गावात तणाव कायम आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. दहशत, दादागिरी आणि गुंडशाही असे म्हणत परळीची बदनामी करणारे, प्रत्यक्षात मात्र स्वतःच शेकडोंचा जमाव, हातात लाठ्या-काठ्या घेऊन दगडफेक करत फिरत आहेत, हल्ले करत आहेत, याची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घ्यावी व कारवाई करावी, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

dhananjay mundemaharashtra assembly electionMaharashtra politicsSharad Pawarvoting centerधनंजय मुंडेपरळी विधानसभामहाराष्ट्र राजकीय बातम्याविधानसभा निवडणुकशरद पवार
Comments (0)
Add Comment