Maharashtra Assembly Election Exit Poll Results 2024 Highlights: महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. या मतदानानंतर आता एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत.
कोणाला किती जागा मिळणार?
MATRIZE च्या पोलनुसार, महायुतीमधील भाजपला सर्वाधिक ८९ ते १०१ जागा मिळू शकतात. तर शिंदे गटाला ३७ ते ४५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला १७ ते २६ जागा मिळू शकतात.
तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २१ ते २९ जागा, काँग्रेसला ३९ ते ४७ जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला ३५ ते ४३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन मोठे पक्ष दोन गटात विभागले गेले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कांटे की टक्कर पाहायला मिळेल. यंदाची निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.
राज्यात कोणत्या पक्षाने किती जागांवर निवडणूक लढवली?
राज्यात भाजपने १४९ जागांवर निवडणूक लढवली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८१ ठिकाणी आपले उमेदवार दिले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ५९ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.
Maharashtra Exit Polls Result 2024: महाराष्ट्रात पुन्हा भाजपच! एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात? मविआला धक्का
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने १०१ जागांवर निवडणूक लढवली, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ९५ ठिकाणी निवडणूक लढवली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ८६ जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.