निकालाच्या आधीचा निकाल! काय सांगतोय महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल्स; राज्यात कोणाचे सरकार येणार? सर्वात ताजा अंदाज

Maharashtra Assembly Election 2024 Poll of Polls: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. या पोलमध्ये कोणाचा विजय होईल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: महाराष्ट्रात पुढील सरकार कोणाचे येणार याचा फैसला आज मतदारांनी घेतला असून राज्यातील २८८ मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती २३ तारखेला जाहीर होणाऱ्या निकालाची होय. राज्याच्या राजकारणात २०१९ नंतर झालेल्या मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता महाविकास आघाडीला की महायुतीला कौल देते याचे उत्तर शनिवारी मिळणार असले तरी त्याआधी विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोल निकाल समोर आले आहेत. या एक्झिट पोलमध्ये राज्यात कोणाची सत्ता येईल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि मतांची टक्केवारी किती असेल याचा अंदाज व्यक्त केला जातो. जाणून घेऊयात या सर्व एक्झिट पोलचा महापोल काय सांगतो.

विविध एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप असेल असे देखील जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
Maharashtra Exit Poll: या एक्झिट पोलने मविआच्या पोटात गोळा आला, राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार! सर्वात मोठा पक्ष कोण?
P-Marqच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १६० जागा तर महाविकास आघाडीला ११९ जागा, अन्यला ९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Matrizeच्या एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला १५० ते १७० जागा आणि महाविकास आघाडीला ११० ते १३० जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्यला ८ ते १० जागा मिळतील असा अंदाज Matrizeने व्यक्त केला आहे. Matrizeच्या एक्झिट पोलनुसार भाजपला ११३, शिवसेना शिंदे गटाला ५२, काँग्रेसला ३५, शरद पवार गटाला ३५, उद्धव ठाकरे गटाला २७, राष्ट्रवादी अजित पवार गटाला १७ तर अन्यला ९ जागा मिळतील असा अंदाज आहे.

Peoples Pulseच्या एक्झिट पोलनुसार राज्यात सत्ताधारी महायुतीला १७५ ते १९५ जागा, महाविकास आघाडीला ८५ ते ११२ जागा तर अन्यला ७ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Chanakya Strategiesनुसार राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १५२ ते १६०, महाविकास आघाडीला १३० ते १३८ आणि अन्यला ६ ते ८ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Dainik Bhaskarच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्ते देण्याची शक्यता आहे. या पोलनुसार मविआला १३५ ते १५० जागा मिळतील असे म्हटले आहे. तर महायुतीला १२५ ते १४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. अन्यला २० ते २५ जागा मिळतील.

Poll Diaryच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपला ७७ ते १०८ जागा, शिवसेना शिंदे गटाला २७ ते ५०, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १८ ते २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला २८८ पैकी १२२ ते १८६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात ६९ ते १२१ जागा मिळतील. मविआमधील काँग्रेसला २८ ते ४७, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला १६ ते ३५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २५ ते ३९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पोल ऑफ पोल्सचा निकाल काय?

महाराष्ट्रातील विविध एक्झिट पोल एकत्र केल्यानंतर चित्र काय आहे याचा विचार केल्यास पोल्स ऑफ पोलनुसार राज्यात महायुतीला १५५ जागा मिळतील. म्हणजे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार. तर महाविकास आघाडीला १२२ जागांवर समाधान मानावे लागले. २८८ पैकी ११ जागा या अन्यला मिळतील असे दिसते.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly election 2024poll of polls 2024एक्झिट पोल २०२४महाराष्ट्र निवडणूक पोल ऑफ पोल्समहाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment