Chandrapur Vidhan Sabha Voting Update: चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या आजच्या घटनांची केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर जिल्ह्यात चर्चा रंगली. पैसे वाटलाच्या आरोपाने भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले. यातून चिमूर शहरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. तर गडचांदुरातही ६० लाखावर जप्ती आणण्यात आली.
भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज भाजप काँग्रेस समोरासमोर आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जिल्हा परिषद कन्याशाळा येथे आझाद वार्ड, नेहरू वार्डचे बुथ आहेत. मतदारांना मदत करण्याकरीता येथे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते लिस्ट घेऊन आहेत. सकाळी ९ च्या सुमारास आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया हे याठिकाणी कार्यकर्त्यासह आले. तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हेही आपल्या काँग्रेस स्टॉलजवळ पोचले. त्यांच्यासोबत बॉऊन्सर होते. आमदार भांगडिया यांनी आक्षेप घेत बॉऊन्सरना जाण्यास सांगीतले. यामुळे केंद्राबाहेर बाचाबाची सुरू झाली. यानंतर घोषणा सुद्धा देण्यात आल्या. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणाव शांत केला. हे सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडले.
गडचांदुरातील घरातून 60 लाखांची रक्कम जप्त
मतदारांना आमिष देण्यासाठी 60 लाखांची रोकड एका घरात लपवून ठेवली होती.याची काँग्रेसने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील ‘ त्या ‘ घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.ज्या घरात रक्कम सापडली आहे, ते घर भाजपच्या कार्यकर्त्याने भाड्याने घेतले होते, अशी माहिती आहे . घरात भाजपचे प्रचार साहित्य सापडले आहे.पुढील कार्यवाही सुरु आहे.
ईव्हीएम मशीन फोडली
चंद्रपूर जिल्हातील भद्रावती येथे एका महिलेने evm मशीन फोडल्याची धक्कादायक घटना घडली. लता शिंगाडे असे महिलेचे नाव असून त्या बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यां असल्याची माहिती पुढे येत आहे. .भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान करण्या करिता जात शिंगाळे यांनी ‘ evm हटाव, संविधान बचाव ‘ असा नारा देत evm मशीन फोडली. बायलेट पेपर वर मतदान घ्या अशी मागणी शिंगाळे यांनी केली यावेळी केली. ही घटना भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेतील बूथ क्रमांक 309 मध्ये 3.30 वाजता घडली. त्यानंतर अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेत तीला पकडून पोलिसांचा हवाली केले. भद्रावतीचे पोलीस निरीक्षक अमोल कचोले मतदान केंद्रावर पोहचत शिंगाडे इला ताब्यात घेत पुढील कार्यवाही करीत आहेत.बल्हारपूर मतदार संघातील मूल शहरात पैसे वाटपाचा आरोपावरून भाजप -काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.
भाजपचा कार्यकर्ता गावात पैसे वाटायला गेला : गावकर्यांनी दिला चोप
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलेल्या पैसे वाटपामूळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले. दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा मतदार संघात भाजपचे पैसे वाटप करणाऱ्या नागपूर येथील तरुणाला नागरिकांनी चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. त्यात भाजप कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या समावेश आहे. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक नांदगाव या गावात मध्यरात्री घडला. या तरुणाकडे गावातील लोकांच्या नावाची यादी सापडली आहे.राजुरा मतदारसंघात अनोळखी महिला,तरुण पैसे वाटप करताना आढळून आले आहेत त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाले आहे. या प्रकाराने राजुरा मतदारसंघातील राजकारण चांगले तापले आहे. काँग्रेस, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पैसे वाटपाचा कार्यक्रम ठीकठिकाणी उधळून लावला आहे.