आधी मतदान, मग लग्न! मतदान केल्यानंतरच नवरी चढली बोहल्यावर, नागपूरच्या नेहाचं सर्वत्र कौतुक

Maharashtra Assembly Election 2024: तिने आधी मतदान केले आणि नंतर लग्न, ‘लोकशाहीच्या उत्सावात आपलाही सहभाग असणे आवश्यक आहे. हे आपले प्रथम कर्तव्य आहे’, अशी प्रतिक्रिया नेहाने व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स
navri vote

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : बोहल्यावर चढण्याची घटिका जवळ आलेली, नववधूने पूर्ण तयारी केलेली. अचानक तिला आठवले की, आज तर मतदानाचा दिवस. आधी कर्तव्य, मग लगीन असा मतदानाचा हट्ट तिने धरला. नातेवाइकांचा नाईलाज झाला. ते नववधूला घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले. तिने मतदान केले आणि नंतर बोहल्यावर उभी झाली.

नेहा महाकाळकर, असे या नववधूचे नाव. लग्नाची तारीख आधीच ठरली होती. अचानक निवडणुकीची घोषणा झाली आणि नेमके लग्नाच्या दिवशीच मतदान आले. आधी लग्न की आधी मतदान, असा संघर्ष निर्माण झाला. तिने आधी मतदान केले आणि नंतर लग्न, ‘लोकशाहीच्या उत्सावात आपलाही सहभाग असणे आवश्यक आहे. हे आपले प्रथम कर्तव्य आहे’, अशी प्रतिक्रिया नेहाने व्यक्त केली. तिने गाडगेनगरमधील अभिनंदन प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
राज्यात मतटक्का वधारला! विधानसभेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य मतदानपेटीत बंद
शेरवानी फेटा घालून मतदान केंद्रात

दक्षिण पश्चिम मतदारसंघात पावणभूमी भागातील मतदान केंद्रांवर एक मतदार शेरवानी फेटा घालून आल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. थेट लग्नातून नवरदेव आला, अशी चर्चा मतदान केंद्र परिसरात पसरली. ‘मी नवरदेव नाही तर नवरदेवाचा भाऊ आहे’, अशी कबुली त्याने दिली. ‘मला लवकर मतदान करू द्या, लग्नाला उशीर होत आहे’, अशी विनंतीही त्याने यावेळी निवडणूक यंत्रणेला केली. मात्र, नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे त्याला रांगेत उभे राहावेच लागले. मतदानानंतर त्याने भावाच्या लग्नाला हजेरी लावली.
Maharashtra Election: अखेरच्या तासांतील मते निर्णायक; लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत किंचित थंड प्रतिसाद
नख खराब होते, शाई लावू नका !
विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ११ सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थात सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सिव्हिल लाइन्स येथील एका केंद्रावर एक युवती मतदानासाठी आली. निवडणूक कर्मचाऱ्यांनी आधार कार्डची तपासणी करून मतदानाची प्रक्रिया सुरू केली. मतदान करण्यापूर्वी डाव्या हाताच्या पहिल्या बोटावर शाई लावली जाते. दुबार मतदान होऊ नये, यासाठी ही पक्की शाई लावली जाते. मात्र, या शाईमुळे माझे नख खराब होईल, असे म्हणत त्या तरुणीने शाई लावण्यास नकार दिला. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अखेर तिची समजूत काढत बोटावर शाई लावण्यात आली आणि तिने मतदान केले.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bride vote before marriagebride vote on marriage daymaharashtra assembly election 2024maharashtra election 2024maharashtra vote percentagemaharashtra voternagpur voting newsनागपूर बातम्यानागपूर विधानसभा निवडणूकलोकशाही
Comments (0)
Add Comment