Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Deprecated: DOMDocument::__construct(): Passing null to parameter #1 ($version) of type string is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/better-amp/includes/classes/class-better-amp-html-util.php on line 24
सर्वाधिक मतदान ‘या’ जिल्ह्यात, मातब्बरांची धाकधूक वाढली, फडणवीस-भागवतांची गुप्त चर्चा, मतदानाच्या रात्रीच सर्व चर्चा झाली - TEJPOLICETIMES

सर्वाधिक मतदान ‘या’ जिल्ह्यात, मातब्बरांची धाकधूक वाढली, फडणवीस-भागवतांची गुप्त चर्चा, मतदानाच्या रात्रीच सर्व चर्चा झाली

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
महाराष्ट्र टाइम्स टॉप १० हेडलाईन्स

१. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूरकरांनी केलं. तीच परंपरा आता विधानसभा निवडणुकीत देखील कोल्हापूरकरांनी कायम ठेवली आहे. राज्यात सर्वाधिक सुमारे ७६.२५ टक्के मतदान करत कोल्हापूर अव्वल स्थानावर असून यात जिल्‍ह्यातील करवीर मतदारसंघ राज्यात अव्वल आला आहे. येथे ८४.७९ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत यंदा २ टक्क्याने वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांची धाकधूक ही आता चांगलीच वाढली आहे. बातमी वाचा सविस्तर…२. विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतटक्का वाढल्याने अधिकच चुरस निर्माण झाली आहे. सुधारित आकडेवारीनुसार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु असल्याने हा आकडा किंचित वाढण्याचा अंदाज आहे.

३. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात आदिवासींनी घराबाहेर पडत भरभरून मतदान केले. परिणामी, मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत ७२.२१ टक्के मतदान झाले होते. घोटी, इगतपुरी, वाडीवडे आदी शहरी भागात दुपारनंतर गर्दी वाढल्याचे चित्र होते. या मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत पस्तीस टक्के, तर तीनपर्यंत ५२.६८ टक्क्यांपर्यंत मतदान गेले होते.

४. विधानसभा निवडणुकीचे मतदान संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विधानसभेसाठी संघ परिवाराने लोकजागर मंचाच्या माध्यमातून ‘सजग रहो अभियान’ राबवत मतदानासाठी आवाहन केले. मतांचा टक्का वाढवण्यात संघाची भूमिका मोलाची मानली जात आहे. बातमी वाचा सविस्तर…

५. माओवाद्यांची दहशत झुगारून गडचिरोली जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सिरकोंडा या गावात दुपारी १ वाजतापर्यंत ८५ टक्के मतदान झाले होते. अतिदुर्गम भागातील नागरिकांनी दहा किमीचा पायी प्रवास करून मतदान केले. या जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान होते. विदर्भातील ६२ जागांवर उत्साही वातावरणात अपवाद वगळता शांततेत मतदान झाले.

६. मध्य नागपूर विधानसभा जागेवर मतदानादरम्यान सुरू झालेला गोंधळ सुरूच आहे. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या समर्थकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मारहाण करत ईव्हीएम हिसकावण्याचा प्रयत्न केला. याच काळात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटनाही समोर आली आहे. ज्यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना मारहाण केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

७. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभाग आणि ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ च्या (पीएमपी) ताफ्यातील सुमारे ७० ते ८० टक्के बस जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी दोन दिवस देण्यात आल्या. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी या दोन दिवसांत मार्गावर बसची घटल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

८. अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिची दोन लग्न झाली असून दोघांसोबतही अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर श्वेताने तिच्या दोन मुलांवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केलंय. कताच श्वेताचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यानंतर तिच्या तिसऱ्या लग्नाच्या अफवा पसरल्या आहेत.

९. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतर आता सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. येत्या २३ तारखेला निकाल लागल्यावर कोणी बाजी मारली हे समजेल. २० नोव्हेंबरला मतदानप्रक्रिया पार पडण्याआधी धुळ्यामध्ये पोलिसांनी पहाटे एक कंटेनर अडवला. त्या कंटेनरची तपासणी केल्यावर त्यामध्ये दहा हजार किलो चांदी पोलिसांना मिळाली. या कंटेनरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या चांदीची किंमत ९४ कोटी ६८ लाखांच्या घरात आहे. नेमकी कोणाची होती ही चांदी जाणून घ्या. बातमी वाचा सविस्तर…

१०. ‘गोल्डन गर्ल’ दीपिकाच्या स्पर्धेतील 11व्या गोलच्या बळावर भारताने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे विजेतेपद राखले. गेल्या वर्षी रांची आणि 2016 मध्ये सिंगापूरमध्ये हे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने कमालीचा समन्वय आणि संयम दाखवून चीनला बाजूला ठेवले होते. पहिल्या हाफमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दीपिकाने उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करून खचाखच भरलेल्या बिहार स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

maharashtra times top 10 headlinestoday highlightstoday latest newstop 10 headlinesआजच्या ठळक घडामोडीआजच्या ताज्या बातम्याटॉप १० हेडलाईन्समहाराष्ट्र टाइम्स टॉप १० हेडलाइन्स
Comments (0)
Add Comment