Jalgaon Accident: लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते. दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती.
हायलाइट्स:
मतदानाची ड्युटी बजावून घरी परतताना शिक्षकाचा मृत्यू
घरी परतताना रस्त्यात भीषण अपघात
चोपडा-गलंगी चौकात दुचाकीचा भीषण अपघात
जळगाव : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्याचदरम्यान, जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे मतदानाच्या (बी.एल.ओ) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी या अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते. दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती. मतदान कर्तव्यावर असताना व काम आटोपून घरी बभळाज गावी रात्री परत जात असताना संध्याकाळी ७ वाजेनंतर हातेड गलंगी दरम्यान व चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. नागरिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान घटनेबद्दल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे लक्ष्मीकांत पाटील यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. Gautam Adani: अदानींच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा, लाच अन् फसवणुकीचा आरोप; फेडरल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
दरम्यान, काल जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली. जुन्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने या हाणामारीत एक जणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील राजमालती नगरमध्ये आपापसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३६, रा. राजमालती नगर, जळगाव) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा