Satara Talathi Accident Death: तलाठी रोहित कदम यांची निवडणुकीच्या कामकाजासाठी आलेवाडी येथे नियुक्ती झाली होती. मतदान प्रक्रियेचे दिवसभर कामकाज करून मतपेट्या सातारा येथे जमा केल्या.
हायलाइट्स:
- एक वर्षापूर्वी लग्न, दोन महिन्यांपूर्वी नोकरी
- इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाची झडप
- साताऱ्यात तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कदम यांना अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले. मात्र, डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुईंज गावावर शोककळा पसरली आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भुईंज येथे दुपारी एक वाजताच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मनमिळावू स्वभावाचा असलेल्या रोहित कदम यांची दोन महिन्यांपूर्वीच तलाठी म्हणून नियुक्ती झाली होती. अवघ्या दोनच महिन्यानंतर ही घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन तारुण्यात मुलाचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता. रोहित यांचे एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.