Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
निकालाआधीच राडा सुरू! काँग्रेसचे कार्यकर्ते झाले आक्रमक; काळा गाढव आणला, शरद कोळीचा पुतळा बसविला - TEJPOLICETIMES

निकालाआधीच राडा सुरू! काँग्रेसचे कार्यकर्ते झाले आक्रमक; काळा गाढव आणला, शरद कोळीचा पुतळा बसविला

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमधील राडा समोर आला आहे. खासदार प्रणिती शिंदेंच्या समर्थकांनी गाढवावर शरद कोळींचा पुतळा बसवला आणि निषेध केला.

Lipi

सोलापूर (इरफान शेख) : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेली जुगलबंदी अद्याप सुरूच आहे. शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारी वरून खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेवर टीका केली होती. शेवटच्या क्षणी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा न देता, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी याना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेच्या बॅनरला जोडेमारून आंदोलन केले होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत, गुरुवारी सकाळपासून शरद कोळीचा निषेध सुरू केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते व प्रणिती शिंदेंचे कट्टर समर्थक शोएब महागामी यांनी स्वतःच्या कार्यलयासमोर काळ्या रंगाचा गाढव आणून त्यावर शरद कोळीचा पुतळा बसविला आणि शिवसेना नेत्याचा निषेध केला.

काळ्या गाढवावरून शरद कोळीची मिरवणूक

खासदार प्रणिती शिंदेंचे कट्टर समर्थक शोएब महागामी यांनी गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी कार्यालयासमोर काळा गाढव आणला. माध्यमांना प्रतिक्रिया देताना,संताप व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खा.प्रणिती शिंदेंच्या निर्णयाचा समर्थन केला.शरद कोळी यांच्या सारखा काळा गाढव आणून शरद कोळी असे संबोधित केले. खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेवर बोलण्याची हिम्मत कशी काय झाली, अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? एक्झिट पोलने दिले उत्तर! शिवसेनेला जास्ती जास्त इतक्या जागा मिळण्याचा अंदाज
काँग्रेस आणि शिवसेनेत जुगलबंदी

शरद कोळी सह शिवसैनिकांनी शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेच्या कार्यालयाबाहेर जोडेमारून निषेध व्यक्त केला. शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा इशारा दिला. गुरुवारी सकाळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी शरद कोळी यांच्या कार्यालया समोर थांबून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि शरद कोळीची गाडी फोडण्यासाठी आलोय अशी प्रतिक्रिया दिली. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारा वरून शिवसेना (उबाठा)आणि काँग्रेसमध्ये जुगलबंदी सुरू झाली आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly election 2024खासदार प्रणिती शिंदेशरद कोळीसुशीलकुमार शिंदेसोलापूर आजच्या बातम्यासोलापूर विधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment