काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये…काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना…पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी या दोन्ही काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली. शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम असल्याचा आरोप केला आहे. शिंदेंनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे.यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशाराही शरद कोळी यांनी दिला आहे. या सगळ्यानंतर शिंदेंचे कट्टर समर्थक शोएब महागामी यांनी शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर गाढव आणत त्यावर शरद कोळी यांच्या पुतळा बसवून जोडेमारून निषेध व्यक्त केला.