महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापनेची शक्यता धुसर, अपक्षांवर असणार मदार; सोलापुरातील उमेदवारांवर विशेष लक्ष

Maharashtra Vidhan Sabha Independent Candidate in Power: एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळेल असे चित्र सध्या दिसत नाही. यासाठी अपक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांना फोनाफोनी सुरु झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरीस पार पडली आहे. आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालावर लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राज्यात सत्ता कशी स्थापन करता येणार यासाठी प्रमुख नेत्यांनी आता कंबर कसली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळेल असे चित्र सध्या दिसत नाही. यासाठी अपक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांना फोनाफोनी सुरु झाली आहे. यातच सोलापूर मधील माढा, करमाळा आणि सांगोला मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना दोन्ही बाजूकडून निरोप येण्यास सुरुवात झाली असल्याचे समजते.

यंदा सोलापूरातील माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरण पाहायला मिळाली. त्यामुळे इतर मतदारसंघांप्रमाणेच येथेही अपक्ष उमेदवारीचे पेव फुटले. यातच माढ्याचे सलग सहावेळा प्रतिनिधीत्व केलेले बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात होते. तर रणजीत शिंदेच येथून विजयी ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे करमाळा विधानसभा मतदारसंघात रणजीत शिंदेंचेच चुलते असलेले अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदेही यावेळी पुन्हा रिंगणात होते. या दोन्ही मोठ्या नेत्यांकडे दोन्ही आघाड्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
Vidhan Sabha Election: अपक्षांकडे सर्वपक्षीयांची नजर, सत्तास्थापनेसाठी लागणार मदत, मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु
दरम्यान सांगोल्यातून शेकापकडून निवडणूक लढवणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे देखील संभाव्य विजयी उमेदवार पाहिले जातेय. सध्या या सर्वच अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूच्या पक्षांचे विशेष प्रयत्न असल्याचे समजते. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणच्या नेत्यांचे फोन आल्याची माहिती यातील एका उमेदवाराने दिली आहे. दोन्हीकडील नेत्यांनी आपल्याचसोबत राहावे असा आग्रह धरला जात असल्याची माहिती उमेदवाराने दिली आहे.

सांगोल्याचे शेकापचे बंडखोर उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी आपल्याला आग्रह केल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मला महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे फोन आले आहेत. मात्र 23 तारखेनंतर जनतेला आणि आमचा पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. तर मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री असल्याचेही देशमुख म्हणाले आहेत.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

independent candidate powermaharashtra vidhan sabha powermahayuti sarkarmva SarkarSolapur constituenciesमहायुतीचे सरकार येणारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकमहाविकास आघाडीचे सत्तास्थापनेचे गणितसत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदतसोलापूर अपक्ष उमेदवार
Comments (0)
Add Comment