Astro remedy mother-in-law and daughter-in-law : सध्या लग्नसराई सुरु झाली असून अनेक वधु-वरांचे लग्न व्यवस्थितरित्या पार पडले असेल. लग्नानंतर अनेकदा घरात वाद होतात. कधी नवरा- बायकोचे तर कधी सासू सुनेचे. बहुतेक कुटुंबात सासू आणि सून यांचे नाते हे अधिक नाजूक असते. कधीकधी दोघेही बरोबर असतात तर कधी दोन्ही चुकीचे. ज्योतिषशास्त्रामध्ये सासू आणि सून यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी काही खास उपाय सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
सध्या लग्नसराई सुरु झाली असून अनेक वधु-वरांचे लग्न व्यवस्थितरित्या पार पडले असेल. लग्नानंतर अनेकदा घरात वाद होतात. कधी नवरा- बायकोचे तर कधी सासू सुनेचे. बहुतेक कुटुंबात सासू आणि सून यांचे नाते हे अधिक नाजूक असते. कधीकधी दोघेही बरोबर असतात तर कधी दोन्ही चुकीचे.
ज्या घरामध्ये सासू-सुनेचे नाते चांगले असते ते घर नेहमी सुखी आणि समृद्धी असते. पण ज्यांच्या घरात सतत वाद होत असतील तर त्यांना शांतता मिळत नाही. त्यामुळे नात्यात दूरावा येतो. ज्योतिषशास्त्रामध्ये सासू आणि सून यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी काही खास उपाय सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
सासू-सुनेचे नाते घट्ट करण्यासाठी
ज्योतिषशास्त्रानुसार सासू-सुनेचे नाते घट्ट करण्यासाठी सूर्योदयापूर्वी घर झाडून घ्या. घरात साचलेला कचरा काढून टाका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. सुनेने पाण्यात गुळ घालून ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे. असे केल्याने दोघांचे नाते घट्ट होते.
कुटुंबातील सकरात्मक वातावरणासाठी
सासु सासऱ्यांसोबत नाते सुधरवायचे असेल तर मंगळवारी रव्याची खीर करुन मंदिराबाहेर बसलेल्या लोकांना वाटावी. तसेच सासू-सुनेने गळ्यात चांदीच्या वस्तू घालव्यात. परंतु, कोणत्याही पांढऱ्या वस्तूची देवाणघेवाण करु नका. यामुळे कुटुंबात सकारात्मक वातावरण राहिल.
दुर्गादेवीची राहिल कृपा
सासू-सुनेत सतत खटके उडत असतील तर सुनेने दुर्गा देवीला लाल रंगाची साडी, बांगड्या, फुले अर्पण करावीत. सासूला भेटवस्तू म्हणून या गोष्टी देखील द्याव्यात. यामुळे नात्यातील दूरावा कमी होतो.
राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी
घरातील सुनेने रोज पूजेनंतर कपाळावर हळद किंवा कुंकू लावावे. असे केल्याने सासू-सुनांमधील दुरावा दूर होईल. घरातील सदस्यांवर राहुचा प्रभाव कमी होईल, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहील.