Sangli MIDC Gas Leakage: सांगली MIDC मधील कंपनीत वायूगळती, दोन महिलांचा मृत्यू; शहरात खळबळ

Sangali Kadegaon MIDC Gas Leakage: या गळतीमुळे अनेक लोक गंभीर झाले असून यातील ५ लोकांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

हायलाइट्स:

  • सांगली MIDC मधील कंपनीत वायूगळती
  • उपाचारादरम्यान दोन महिलांचा मृत्यू
  • सांगली शहरात खळबळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सांगली कडेगाव एमआयडीसी कंपनी वायूगळती

सांगली : कडेगाव तालुक्यातील शाळगावमधील MIDC मधील म्यानमार केमिकल कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर वायूगळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या विषारी वायूमुळे अनेक लोक गंभीर झाले असून यातील ५ लोकांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनेक जणांना या वायूची बाधा झाली आहे. तर प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत वायूगळती थांबवली.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

kadegaon midc air leaksangli kadegaon midc company air leaksangli marathi latest marathi newssangli midc air leakकडेगाव एमआयडीसी वायूगळतीसांगली एमआयडीसी वायूगळतीसांगली कडेगाव एमआयडीसी कंपनी वायूगळतीसांगली मराठी लेटेस्ट मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment