Budh Vakri 2024 : बुध वृश्चिक राशीत वक्री! पुढील १९ दिवस मिथुनसह ४ राशींचे बारा वाजणार, आर्थिक संकट वाढणार

mercury retrograde in scorpio : ज्योतिषशास्त्रानुसार २६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी बुध वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्तेचा कारक ग्रह मानला जातो. व्यवसाय, वाणिज्य, बुद्धिमत्ता आणि वाणीसाठी बुध अतिशय शुभ आहे. परंतु, बुध वक्री झाल्यामुळे अनेक राशींना नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया त्या राशींबद्दल सविस्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Budh Vakri 2024 : बुध वृश्चिक राशीत वक्री! पुढील १९ दिवस मिथुनसह ४ राशींचे बारा वाजणार, आर्थिक संकट वाढणार

Budh Vakri In vrishchik rashi :
ज्योतिषशास्त्रानुसार २६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी बुध वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्तेचा कारक ग्रह मानला जातो. व्यवसाय, वाणिज्य, बुद्धिमत्ता आणि वाणीसाठी बुध अतिशय शुभ आहे. परंतु, बुध वक्री झाल्यामुळे अनेक राशींना नुकसान होऊ शकते.
बुधाच्या वक्री होण्यामुळे कौटुंबिक जीवनापासून ते करिअरपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. येत्या १९ दिवसात बुध वक्रीमुळे मिथुनसह ४ राशींवर संकट येणार आहे. त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया त्या राशींबद्दल सविस्तर

मेष राशीवर बुध वक्रीचा प्रभाव

बुध वक्रीमुळे मेष राशीच्या लोकांना फायदा घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. कारकीर्दीपासून कौटुंबिक नातेसंबंधांपर्यंत अनेक संकटे येतील. या काळात कामाचा ताण अधिक राहिल. व्यापारी आणि नोकरदार लोकांना कामात मोठे नुकसान सहन करावे लागेल. नातेसंबंधात संयम राखणे महत्त्वाचे आहे.

मिथुन राशीवर बुध वक्रीचा प्रभाव

बुध वक्रीमुळे मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगले नसेल. व्यावसायाकडे अधिक लक्ष केंद्रित करता येणार नाही. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही अनपेक्षित खर्च वाढतील. जोडीदाराशी काही मुद्द्यांवरुन वाद होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. पोटाचे विकार वाढतील.

कर्क राशीवर बुध वक्रीचा प्रभाव

कर्क राशीच्या लोकांना बुध वक्रीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडू शकतो. करिअर क्षेत्रात तुमच्यावर अधिक भार येईल. तुमच्या मेहनतीनुसार कमाई करता येणार नाही. अहंकारामुळे नात्यात दूरावा येईल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह राशीवर बुध वक्रीचा प्रभाव

सिंह राशीवर लोकांना बुध वक्रीमुळे करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात नोकरीबद्दल तुमचे चिंतेत असाल. व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागेल. पार्टनरशीपमध्ये संबंध बिघडू शकतात. पैसे कमावले तरी त्याचा आनंद घेता येणार नाही. पायदुखीची समस्या वाढेल

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Budh Vakri 2024Budh Vakri horoscope in marathiBudh Vakri In vrishchik rashiMercury Retrograde In Scorpioबुध वक्रीचा कोणत्या राशीवर परिणामबुध वृश्चिक राशीत वक्री
Comments (0)
Add Comment