Maharashtra Election Strike Rate : लढलेल्या जागांपैकी विजय मिळालेल्या जागा या सूत्रानुसार स्ट्राईक रेट काढला जातो. म्हणजेच एखाद्या पक्षाने ८० जागा लढवल्या, आणि ४० जिंकल्या, तर ५० टक्के हा स्ट्राईक रेट मानला जातो
काय आहे स्ट्राईक रेट?
लढलेल्या जागांपैकी विजय मिळालेल्या जागा या सूत्रानुसार स्ट्राईक रेट काढला जातो. म्हणजेच एखाद्या पक्षाने ८० जागा लढवल्या, आणि ४० जिंकल्या, तर ५० टक्के हा स्ट्राईक रेट मानला जातो. १९९९ मध्ये महायुतीत भाजपचा स्ट्राईक रेट ४८ टक्के राहिला होता. २००४ मध्ये ४९ टक्के,
२००९ मध्ये ३९ टक्के इतका होता. २०१४ मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढले, त्यावेळी तो ४७ टक्क्यावर गेला. २०१९ मध्ये पुन्हा युतीत लढताना त्यात घसघशीत वाढ होऊन तो ६९ टक्के (१५२ पैकी १०५ जागांवर विजय) इतका झाला होता. तर शिवसेनेचा ४५ टक्के (१२४ पैकी ५६ जागांवर विजय) हा मोदी लाटेत शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट होता.
मुख्यमंत्री संख्याबळानुसार न ठरवता चर्चेने ठरेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारावेळी चर्चेने मुद्दा सोडवण्याचं सांगितलं होतं. परंतु मुख्यमंत्रिपदाचा निकष किंवा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला नव्हता.
भाजपच्या बाजूने पारडं जड?
ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र महायुतीत ठरलेलं नाही. भाजपने सर्वाधिक जागा लढवल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या जास्त जागा निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा निकष असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे किती लढवल्या आणि त्यापैकी किती जिंकल्या, हा महत्त्वाचा निकष ठरुन स्ट्राईक रेटनुसार भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक मानली जाते. एक्झिट पोलचे अंदाजही भाजपच्या बाजूने आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे दावे करत गुगली टाकली होती, त्यामुळे पुढे काय होणार, हे काही तासात समजेल.