Thane-Konkan Assembly Election Result 2024 Live: ठाणे-कोकणच्या जागेवर कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स

  • 10:07 AM, Nov 23 2024

    कणकवलीत निलेश राणे पिछाडीवर

  • 10:01 AM, Nov 23 2024

    पहिल्या फेरीत दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम 621 मतांनी आघाडीवर

  • 09:57 AM, Nov 23 2024

    भिवंडी पूर्व मधून रईस शेख पिछाडीवर, शिवसेनेचे संतोष शेट्टी ३ हजार ८५० मतांनी आघाडीवर

  • 09:44 AM, Nov 23 2024

    मतदारसंघ – मिरा-भाईंदर

    आघाडी उमेदवार – मुझ्झफार हुसैन
    पक्ष – महाविकास आघाडी

    पहिली फेरी
    6070 मतांनी आघाडी

    3597 नरेंद्र मेहता
    6070 मुझ्झफर हुसैन
    192 संदीप राणे
    791 गीता जैन

  • 09:42 AM, Nov 23 2024

    ठाणे शहरमध्ये संजय केळकर यांची आघाडी कायम, तर मतांमध्ये द्वितीय स्थानावर अविनाश जाधव आणि तृतीय स्थानावर राजन विचारे

  • 09:41 AM, Nov 23 2024

    निलेश राणे २१४ मतांनी आघाडीवर

  • 09:38 AM, Nov 23 2024

    भिवंडी पूर्व शिवसेनेचे संतोष शेट्टी ३ हजार ८५० मतांनी आघाडीवर

  • 09:27 AM, Nov 23 2024

    कल्याण ग्रामीण मधून शिवसेना शिंदे गट आघाडीवर

  • 09:26 AM, Nov 23 2024

    कोकणातील कणकवली विभागातून निलेश राणे यांची पिछाडी पण नितेश राणे आघाडीवर

  • 09:25 AM, Nov 23 2024

    डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

    पहिली फेरी – एकूण ९४४२ मते

    महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण-५९२२

    महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे – ३१२२

  • 09:23 AM, Nov 23 2024

    शहापूर मतदार संघ

  • 09:10 AM, Nov 23 2024

    ओवळा माजीवडा मतदारसंघात पहिल्या फेरीत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक ५ हजार ९६८ मतांनी आघाडीवर

  • 09:10 AM, Nov 23 2024

    ओवळा माजीवडा मतदारसंघात पहिल्या फेरीत शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना ८ हजार २३१ मत मिळाली तर उबाठा गटाला २ हजार २६३ मते मिळाली आहेत

  • 09:09 AM, Nov 23 2024

    कोकणातील कणकवली विभागातून नितेश राणे ४ हजार ४०० मतांनी आघाडीवर

  • 09:08 AM, Nov 23 2024

    कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड ३,४७६ मतांनी आघाडीवर

  • 09:06 AM, Nov 23 2024

    कोपरी -पाचपाखाडी विधानसभा मतदार संघाची पोस्टल बॅलेट मतमोजणी ८:30 वाजता सुरु झाली आहे.

  • 09:04 AM, Nov 23 2024

    ठाणे शहरातून भाजपचे संजय केळकर, ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात लढत आहे.

  • 09:02 AM, Nov 23 2024

    भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे शांताराम मोरे ५३११ मतांनी आघाडीवर

  • 09:02 AM, Nov 23 2024

    ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरुवातीला ४,२३१ मतांची आघाडी घेतली आहे.

  • 08:58 AM, Nov 23 2024

    कोकणात सावंतवाडी विभागातून शिंदे शिवसेनेच्या गटातील दिपक केसरकर यांची आघाडी

  • 08:56 AM, Nov 23 2024

    टपाल मतमोजणीत कोकणात महायुतीच्या १२ , महाविकास आघाडीच्या ५ तर मनसेची १ जागेने आघाडी

  • 08:38 AM, Nov 23 2024

    ठाणे, कोकणात महायुती चार जागांवर आघाडीवर आहेत

  • 08:32 AM, Nov 23 2024

    ठाकरे गटाचे राजन तेली सावंतवाडी येथून आघाडीवर

  • 08:29 AM, Nov 23 2024

    चिपळूण येथून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शिखर निकम आघागाडीवर

  • 08:28 AM, Nov 23 2024

    कणकवली मतदारसंघातून नितेश राणे यांची आघाडी

  • 08:09 AM, Nov 23 2024

    कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदेंसमोर दिघेंच्या पुतण्याचे आव्हान आहे

  • 08:08 AM, Nov 23 2024

    एकनाथ शिंदेंना पोस्टल मतमोजणीत आघाडी मिळाली आहे

  • 08:07 AM, Nov 23 2024

    कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून सुरुवातीच्या कलानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत

  • 07:55 AM, Nov 23 2024

    47 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी आय टी आय, वर्कशॉप -1, वागळे इस्टेट, ठाणे येथे मतमोजणी होणार आहे.

  • 07:55 AM, Nov 23 2024

    ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात एकूण मतमोजणीच्या 24 फेऱ्या होणार आहेत.

  • 07:21 AM, Nov 23 2024

    ठाण्यात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार

  • 07:12 AM, Nov 23 2024

    ठाण्याच्या जागेवर भाजपचे संजय केळकर आणि शिवसेनेचे (उद्धव गट) राजन विचारे यांच्यात चुरशीची लढत आहे.

  • 07:09 AM, Nov 23 2024

    कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्री शिंदेंना केदार दिघे यांचे आव्हान

  • 07:08 AM, Nov 23 2024

    कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात

  • 06:33 AM, Nov 23 2024

    दिड तासांनी मतमोजणीला सुरुवात होईल.

  • 06:11 AM, Nov 23 2024

    ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, उल्हासनगर, ऐरोली, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, डोंबिवली, बेलापूर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, मीरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड आणि शहापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

  • 06:10 AM, Nov 23 2024

    आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल

  • 06:10 AM, Nov 23 2024

    कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून याआधी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी पताका फडकावली आहे

  • 06:09 AM, Nov 23 2024

    ठाणे शहरातून भाजपचे संजय केळकर विद्यमान आमदार आहेत

  • 06:08 AM, Nov 23 2024

    ठाणे जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांचा निकालही आज समोर येईल.

  • 06:08 AM, Nov 23 2024

    आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर राज्यात कोणाचं सरकार येईल, हे स्पष्ट होणार.

  • 06:07 AM, Nov 23 2024

    राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाचे काउंटडाउन सुरू झाले आहे

  • Source link

    Maharashtra Kopri - Pachpakhadi Assembly Election resultMaharashtra Kopri - Pachpakhadi Assembly Election resultMaharashtra Kopri - Pachpakhadi Vidhan Sabha Election result 2024Maharashtra Kopri - Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 live newsMaharashtra Thane Assembly Election ResultThane Assembly election result 2024महाराष्ट्र कणकवली विधानसभा निवडणूक निकालमहाराष्ट्र कोपरी-पाचपाखाडी विधान सभा निवडणूक निकाल 2024महाराष्ट्र ठाणे विधानसभा निवडणूक निकाल २०२४महाराष्ट्र ठाणे शहर विधानसभा निवडणूक निकालमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक
    Comments (0)
    Add Comment