Parli Dhananjay Munde vs NCP sharad pawar rajesaheb deshmukh Vidhan Sabha Election 2024 Result : परळी विधानसभेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत बघायला मिळाली. आता अखेर धनंजय मुंडे हे विजयी ठरले आहेत.
परळी मतदार संघाचा निकाल आला असून धनंजय मुंडे हे विजयी ठरले आहे. महायुतीचा हा मोठा विजय मानला जातोय. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक लढवली. धनंजय मुंडेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची नक्कीच आहे. त्यामध्येच सुरूवातीपासूनच धनंजय मुंडे हे आघाडीवर होते. धनंजय मुंडेचे लीड चांगलेच वाढताना दिसले. 11 फेरीत ते 64397 मतांची आघाडीवर होते.
65 मतांनी धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचे शेवटी बघायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख हे उतरले होते. धनंजय मुंडे हे जोरदार प्रचार करताना दिसले. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या देखील धनंजय मुंडेसाठी मैदानात उतरल्या होत्या. संपूर्ण मुंडे कुटुंबियांनी एकत्र येत मतदान देखील केले होते. विजयानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ही निवडणूक विकासाच्या मुद्दावर झालीये.
जातीचे राजकारण गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीमध्ये बघायला मिळाले नाही विकासाच्या मुद्दावर ही निवडणूक झालीये. मायबाप जनतेने हा काैल दिल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह देखील बघायला मिळाला. जनतेचे धन्यवाद मानताना देखील धनंजय मुंडे हे दिसले आहेत. परळी मतदारसंघात 16 व्या फेरी अखेर धनंजय मुंडे यांना 95430 मतांची आघाडी मिळालीये. बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे 17 व्या फेरी अखेर 1,00017 मतांनी आघाडीवर