Sakoli Congress Nana Patole vs BJP Avinash Bramhankar Vidhan Sabha Election 2024 Result: साकोली येथून काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात चुरशीची लढत असून, दोघांपैकी कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांना ४१.६३%मते मिळाली असून भाजपच्या परिणय रमेश फुके यांच्यावर ३८.९०% मते मिळवून विजय मिळवला. या वर्षी महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात निवडणूका झाल्या. त्यामुळे आता नाना पटोले आणि अविनाश ब्राह्मणकर यांच्यात कडवी लढत असल्यामुळे साकोली येथून कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर. नाना पटोले दुसऱ्या फेरीत ६८७ मतांनी आघाडीवर तर अविनाश ब्राह्मणकर पिछाडीवर. चौथ्या फेरीत नाना पटोले ४५१ मतांनी आघाडीवर. पाचव्या फेरीत नाना पटोले ३५९ मतांनी आघाडीवर. सहाव्या फेरीत नाना पटोले ३७२ मतांनी आघाडीवर. सातव्या फेरीत नाना पटोले ११७ मतांनी आघाडीवर. नाना पटोले आघाडीवर, आठव्या फेरीत ५४६ मतं. नाना पटोले नवव्या फेरीत २५८ मतांनी आघाडीवर.
१० व्या फेरीत भाजपाचे अविनाश ब्राम्हणकर ४७६ मतांनी आघाडीवर. ११व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ५३६ मतांनी आघाडीवर. १२ व्या फेरीत अविनाश ब्राह्मणकर ८७१ मतांनी आघाडीवर. १३ व्या फेरीत नाना पटोले ३२१ मतांनी आघाडीवर