शरद पवार, फडणवीसांच्या पावसात सभा; तिथे निकाल काय लागला? मतांचा पाऊस कोणावर?

Maharashtra Election Result 2024 Update: गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पावसातील सभा गाजली होती. पावसातील सभेनं वातावरण फिरलं आणि त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पावसातील सभा गाजली होती. पावसातील सभेनं वातावरण फिरलं आणि त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. निकालानंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. त्यामुळे यंदाही पावसातल्या सभा चर्चेचा विषय ठरल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शपचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांमध्ये पाऊस पडला होता. दोन्ही नेत्यांनी पावसात भाषणं केली होती.

कोल्हापूरच्या इचलकरंजी मतदारसंघात शरद पवारांनी १५ नोव्हेंबरला प्रचार सभा घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे इचलकरंजीतून उमेदवार होते. या सभेत पवारांचं भाषण सुरु असताना पावसाला सुरुवात झाली आणि अनेकांना ५ वर्षांपूर्वी झालेली पावसातील सभा आठवली. आता मतमोजणी सुरु असताना कारंडे पराभवाच्या छायेत आहेत. ते मोठ्या फरकानं मागे पडले आहेत.

इचलकरंजीत भाजपचे राहुल आवाडे ८७ हजार ९२२ मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर शरद पवारांच्या पक्षाचे मदन कारंडे ५२ हजार ७०२ मतांसह दुसऱ्या स्थानी आहेत. कारंडे सध्या ३४ हजार ९२२ मतांनी मागे आहेत. मतमोजणीच्या २० पैकी १३ फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे कारंडे यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी १५ नोव्हेंबरला शिराळ्यात सभा घेतली होती. या सभेत पाऊस झाला होता. फडणवीस यांनी पावसात भिजत भाषण केलं. भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना विजयी करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं. आता मतमोजणीच्या १७ फेऱ्यांनंतर देशमुख यांच्याकडे मोठी आघाडी आहे आणि ती निर्णायक ठरताना दिसत आहे.

भाजपच्या सत्यजीत देशमुख यांना १ लाख २९ हजार ४८८ मतं मिळाली आहेत. तर शरद पवार पक्षाचे नेते मानसिंग नाईक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना १ लाख ६ हजार ७०० मतं मिळाली आहेत. त्यांची पिछाडी २२ हजार मतांहून अधिक आहे. त्यामुळे सत्यजीत देशमुखांचा विजय नक्की मानला जात आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस फडणवीसांसाठी लाभदायक ठरलेला दिसत आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpmaharashtra assembly electionmaharashtra assembly resultncpइचलकरंजीदेवेंद्र फडणवीसपावसात सभामहाराष्ट्र राजकीय बातम्याशरद पवारशिराळा
Comments (0)
Add Comment