Shree Krishna chi Kaliyug Bhavishyavani: श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, ‘परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.’ महाभारतातील कथेनुसार, द्वापर युगात श्रीकृष्ण यांनी पांडवांना सांगितले होते की कलियुगात काय काय बदल होणार आहेत. कलियुगातील भविष्यवाणी करताना त्या काळातील स्त्री-पुरुष कसे असतील याबद्दल ही श्रीकृष्ण यांनी सांगितले होते. चला, तर मग विस्ताराने जाणून घेऊया. कलियुगातील स्त्री-पुरुषांबद्दल श्रीकृष्ण यांनी काय भविष्यवाणी केलेली आहे.
कलियुगात पुरुष कसे असतील?पुरुष धन, संपत्तीसाठी हत्या करतील
श्रीकृष्णांच्या भविष्यवाणीनुसार, कलियुगात पुरुष इतके क्रूर होतील की ते नातेसंबंधांचाही विचार करणार नाहीत. ते धनसंपत्तीसाठी हत्या करतील. धन, संपत्ती आणि मालमत्ता मिळविण्यासाठी हत्या करणे सामान्य होईल. लहान-मोठ्या कारणांवर पुरुषांमधील बदल घेण्याची वृत्ती अधिक जागृत होईल आणि अधिकाधीक क्रूर होऊन विनाशाच्या मार्गावर चालतील.
पुरुष स्त्रियांना कमी लेखून त्यांचा उपहास करतील
श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात पुरुष स्त्रियांना हीन दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यांचा उपहास करतील. स्त्रियांचा अपमान करून पुरूषांना काहीतरी महान कार्य केल्याची अनुभूती होईल. पुरुष महिलांना नेहमीच कमी लेखतील. पुरुष स्वतःची गौरव गाथा सांगून महिलांचा त्याग आणि साहस याकडे दुर्लक्ष करतील.
पुरुष गुणवान स्त्रियांपेक्षा सुंदरतेला महत्त्व देतील
श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात पुरुष स्त्रियांच्या कलागुणांकडे दुर्लक्ष करतील. ते फक्त महिलांच्या सुंदरतेला महत्त्व देतील. पुरुष चारित्र्यवान स्त्रियांना महत्त्व देणार नाहीत आणि मर्यादा तोडून केवळ आनंदासाठी महिलांच्या सहवासात राहतील.
कलियुगात स्त्री कशी असेल?धनवान पुरुषाला पसंती देतील स्त्रिया
श्रीकृष्णाने कलियुगातील महिलांच्या स्वभावाबद्दल भविष्यवाणी केलेली आहे. कलियुगात स्त्रिया गरीब आणि धनहीन पतींना सोडून जातील. धनवान, श्रीमंत पुरुषांनाच स्त्रिया पसंती देतील. स्त्रिया धनवान पतीच्या इच्छेने त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करतील.
महिला एकमेकांचा द्वेष करतील
कलियुगात एखाद्या महिलेला दुसऱ्या महिलेच्या दुःखाची जराही जाणीव असणार नाही. महिला एकमेकांचा द्वेष करतील आणि स्वतःची ताकद वाढविण्यासाठी दुसऱ्या महिलांचे शोषण करतील. हुशार महिलांना हास्यास्पद ठरवून काही महिला आपण स्वतः किती ग्रेट आणि सभ्य आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतील.
पुरुषांच्या अनैतिक कृत्यांना सहकार्य करतील
स्त्रिया त्यांच्यासाठी पुरुषांच्या अनैतिक आणि अपराधिक वागुणकिला समर्थन देतील. पुरुषांना योग्य-अयोग्य समजावण्याऐवजी महिला त्यांच्या चुकीच्या कामांचे समर्थन करतील. स्त्रिया त्यांच्या फायद्यासाठी नातेसंबंधांच्या मर्यादा तोडण्यास जराही मागे पुढे पाहणार नाहीत. कलियुगात स्त्री-पुरुष दोघेही विवेकशुन्य आणि असभ्य वर्तन करतील.